Take a fresh look at your lifestyle.

म्हणून अधिकारींनी सुनावालेय नेत्यांना; पहा कशामुळे झटका बसलाय मोदींच्या भाजपला..!

दिल्ली : पश्चिम बंगाल राज्यात सत्तासोपान चढू न शकलेल्या भाजपला त्या निकालाने मोठाच झटका बसला आहे. उत्तरप्रदेश यासारख्या मोठ्या राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो न वापरण्याचा नामुष्कीचा निर्णय या निकालाने केंद्रात सत्ताधारी असलेल्या या पक्षाला घ्यावा लागला होता. आता याच निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काहीजणांनी आतल्या गोष्टी जगजाहीर करायला सुरुवात केली आहे. निवडणुकी आधी पक्षात आलेले नेते आता पुन्हा स्वगृही परतत आहेत. तसेच पक्षातीलच काही नेते पक्षाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यामुळे या राज्यात भाजपला पुढील वाटचाल आधिक कठीण ठरणार असल्याचे दिसत आहे.

Advertisement

काही नेत्यांच्या अति आत्मविश्वासामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजपला पराभव स्वीकारावा लागला. या अति आत्मविश्वासामुळेच जमिनीवरील परिस्थिती समजून घेता आली नाही, अशा शब्दांत सुवेंदू अधिकारी यांनी सुनावले आहे. ते पुढे म्हणाले, की निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यात आपण चांगली कामगिरी केली होती. मात्र, त्यानंतर आपल्या काही नेत्यांना भाजप 160 ते 170 जागा सहज मिळवेल असा विश्वास वाटू लागला. पण त्याचवेळी या नेत्यांनी वास्तवात काय परिस्थिती आहे याचा अंदाज घेतला नाही, याचा मोठा फटका पक्षास बसला.

Advertisement

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी अगदी जोरदार तयारी केल्यानंतरही या राज्यात भाजपला दणदणीत पराभव स्वीकारावा लागला. निवडणुकीतील पराभवानंतर भाजपला एका पाठोपाठ झटके बसत आहेत. तृणमूल काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या अनेक नेत्यांनी पुन्हा घरवापसी सुरू केली आहे. तर दुसरीकडे पक्षातीलच नेते घरचा आहेर देत आहेत. निवडणुकीतील पराभवासाठी पक्षातील काही नेत्यांना जबाबदार ठरवण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. निवडणुकी आधी भाजपमध्ये आलेले सुवेंदू अधिकारी यांनी आता पक्षातील काही नेत्यांवर निशाणा साधला आहे.

Advertisement

एप्रिल महिन्यात केरळ, तामिळनाडू, आसाम, पश्चिम बंगाल आणि पाँडेचेरी या 5 राज्यांच्या निवडणुका पार पडल्या. भाजपने मात्र बंगालच्या निवडणुकीवर सर्वाधिक लक्ष केंद्रीत केले होते. पक्षाने येथे आपली सर्व ताकद झोकून दिली होती. केंद्रातील मंत्री, पक्षाचे मोठे नेत्यांनी राज्यात जोरदार प्रचार केला. रोड शो, जाहीर सभांद्वारे सरकार विरोधात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. दोनशे पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा दावा करणाऱ्या पक्षास येथे शंभर जागाही जिंकता आल्या नाहीत. या निवडणुकी भाजपला पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर आता येथे वेगळेच राजकारण सुरू झाले आहे.

Advertisement

म्हणून मोदी सरकारचे अभिनंदन जोरात; पहा नेमकी काय ‘कामगिरी’ केलीय त्यांनी

Advertisement
Advertisement

Leave a Reply