Take a fresh look at your lifestyle.

पाचपुतेंच्या ‘काष्टी’मध्ये कोट्यावधींचा भ्रष्टाचार; पहा नेमके काय घडलेय प्रकरण

अहमदनगर : सहकार महर्षी काष्टी सेवा संस्थेच्या संचालक मंडळ, तसेच सचिव, व्यवस्थापक व कर्मचारी यांना कलम ८३ च्या चौकशीनंतर कलम १४६ प्रमाणे कारवाई का करू नये अशी नोटीस मिळाली आहे. श्रीगोंद्यातील सहायक निबंधक सहकारी संस्था यांनी बजावणी केलेल्या नोटिसांमुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप आता या संस्थेवर होत आहेत.

Advertisement

राज्यात नावलौकिक असलेल्या काष्टी येथील सोसायटी नंबर एकचे सर्वेसर्वा भगवानराव पाचपुते यांच्यावर आता याप्रकरणी आरोप होण्यास सुरुवात झाली आहे. राकेश पाचपुते व सुनील माने यांनी याप्रकरणी सहकार खात्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते सहकार मंत्र्यापर्यंत पुराव्यासह केलेल्या तक्रारीमुळे याकडे सर्वांचे लक्ष गेले. त्यानंतर हाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६० चे कलम ८३ नुसार प्रमुख बारा मुद्द्यावर १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०२० या कालखंडातील कारभाराची चौकशी करण्यात आल्यावर अनेक मुद्दे पुढे आलेले आहेत.

Advertisement

अहवालामध्ये नमूद केलेल्या निष्कर्षानुसार सर्वच मुद्द्यावर संस्था संचालक मंडळ, सचिव, व्यवस्थापक हे दोषी असल्याचे सहकार खात्याकडून सुचित केलेले आहे. माजी अध्यक्ष कैलासराव पाचपुते, अॅड. विठ्ठलराव काकडे, माजी उपसभापती वैभव पाचपुते, प्रकाश शिवराम पाचपुते, दत्तात्रय गेणबा पाचपुते, मधूकर क्षीरसागर, आरपीआयचे बंडू जगताप, काशिनाथ काळे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Advertisement

संस्थेत संचालक मंडळ व सचिव यांनी संगणमत करून गैरकारभार करून संस्था अडचणीत असून भगवानराव यांचा मुलगा प्रताप याचा परदेश दौरा संस्थेला माल पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून झाल्याचेही म्हटले आहे. याची जबाबदारी निश्चित करून सहायक निबंधक यानी चौकशी कामी नामदेव ठोंबळ कोपरगाव यांची नियुक्ती केली आहे.

Advertisement

१९९६ पासून २०२० पर्यंत २४ वर्षे एकाच जागेवर सचिव म्हणून काम पहाणारा एस. बी. बुलाखे यांना जिल्हा उपनिबंधक यांनी गैरकारभाराबध्दल निलंबित करून भगवानराव यांना सहकार खात्याने दणका दिला. चौकशी अधिकारी म्हणून जामखेड येथील देवीदास घोडेचोर याची नियुक्ती केली.

Advertisement
चौकशी अहवालातील महत्वाचे मुद्दे :
३० मार्च २०२१ रोजी प्राधिकृत चौकशी अधिकारी याचा ७८७ पानाचा चौकशी अहवाल शासनास सादर
पाच वर्षात कमाल मर्यादेपेक्षा जास्त कर्जवाटपामध्ये संस्थेच्या १२८ सभासदांना २ कोटी २१ लाख ७८ हजार ५०० रुपये इतक्या रक्कमेचे संस्थेने नियमबाह्य कर्जवाटप
संस्थेचे आजी माजी पदाधिकारी व त्याच्या कुटुंबातील सदस्यांना नियमबाह्य कर्ज वितरण
दैनंदिन कामकाजावर ज्याचे बारकाईने लक्ष असते ते भगवानराव यांच्या कुटुंबातील पत्नी, मुलगी, पुतण्या, भावजई यांनाही नियमबाह्य कर्ज दिल्याचे चौकशीत समोर
१२८ पैकी ९५ सभासदांच्या नावाने कर्जमाफीसाठी शासनाकडे प्रस्ताव दाखल करताना सभासदांना नियमबाह्य कर्जे व कर्जमाफी मिळवून देत शासनाची फसवणूक केल्याचा ठपका

 

Advertisement

Advertisement

Leave a Reply