Take a fresh look at your lifestyle.

अहमदनगरला घातलेय ‘त्यांनी’च खड्ड्यात; पहा काय आरोप केलाय ‘आप’च्या आंदोलकांनी

अहमदनगर : शहर म्हणजे पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि मुंबई यांना जोडणारे शहर. मात्र, येथील औद्योगिक वसाहतीची दुरवस्था आणि खड्ड्यांची परिस्थिती यामुळे नगरकर वैतागले आहेत. फ़क़्त सत्तांतर होतात आणि शहराचे मुद्दे आणि विषय तसेच राहतात. त्याकडे आज आम आदमी पार्टीने लक्ष वेधणारे आंदोलन केले आहे.

Advertisement

शहरात पाईपलाइन व ड्रेनेजलाईनसाठी मोठ्या प्रमाणात रस्ते खोदण्यात आले होते. मात्र ते खड्डे व्यवस्थित बुझविण्यात आलेले नाही. पावसामुळे अनेक निकृष्ट रस्ते मोठ्या प्रमाणात उघडून, शहरातील अनेक रस्ते खड्डेमय बनले आहे. लोकप्रतिनिधी या प्रश्‍नाकडे डोळेझाक करीत आहे. लोकप्रतिनिधींनी टक्केवारीपायी शहर खड्ड्यात टाकले असल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आला आहे.

Advertisement

शहरातील अनेक रस्ते खड्डेमय बनले असताना आम आदमी पार्टीच्या वतीने खड्ड्यात उतरुन आंदोलन करण्यात आले. लोकप्रतिनिधींनी शहर खड्ड्यात टाकल्याच्या घोषणा देत शहरातील शनि चौकातील खड्डेमय रस्त्यावर  महापालिकेचा निषेध नोंदविण्यात आला. या आंदोलनात आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष राजेंद्र कर्डिले, महिला स अंघटक सुचिता शेळके, संपत मोरे, रवी सातपुते, दिलीप घुले, रेव्ह. आश्‍विन शेळके आदी सहभागी झाले होते.

Advertisement

शहरातील प्रमुख रस्त्यांवर खड्डे पडलेले असल्याने नागरिकांना मोठी कसरत करुन वाहने चालवावी लागत आहे. महिला व ज्येष्ठ नागरिकांचे खड्डेमय रस्त्यांमुळे लहान-मोठे अपघात होत आहे. तर नागरिकांना पाठ दुखीचा त्रास सुरु झाला आहे. पावसाळा सुरु होण्यापुर्वी महापालिका प्रशासनाने या प्रश्‍नाकडे लक्ष न दिल्याने खड्डेमय रस्ते धोकादायक व जीवघेणे बनले असून, महापालिकेने त्वरीत खड्डेमय रस्त्यांची पॅचिंग करण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.

Advertisement

भयंकरच की.. ‘त्यामुळे’ आहे तब्बल १०० कोटी जनतेला धोका; भारतासह शेजारील देशही प्रभावित

Advertisement

चीनच्या ‘त्या कर्तुत्वा’मुळे अमेरिकेला करावे लागले ‘तसेही’; पहा काय चालूये जागतिक राजकारणात

Advertisement
Advertisement

Leave a Reply