Take a fresh look at your lifestyle.

मग ‘त्या’ दोन मंत्र्यांना मिळणार डच्चू; पहा नेमके काय चालूये काँग्रेस पक्षामध्ये

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष मोर्चेबांधणी करीत आहेत. त्यातच आता कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्लीवारी केली आहे. तसेच पक्षातील दोन ‘अकार्यक्षम’ मंत्र्यांना डच्चू देऊन राज्याची पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी हालचाली चालू आहेत. मात्र, याबाबत अधिकृतरीत्या काहीही जाहीर झालेले नाही.

Advertisement

कॉंग्रेसच्या केंद्रीय पातळीवर मोठे बदल होत असतानाच राज्यातही हे वारे आलेले आहे. विधानसभा अध्यक्षपदही लवकर भरण्याचा काँग्रेसचा ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आग्रह असल्याचे समजते. मात्र, त्यांनी यावर सबुरीने घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच तिन्ही पक्षांतील रिक्त मंत्रिपदे एकत्रित भरण्याचा आघाडी सरकारचा विचार असून विशेष अधिवेशन घेऊन विधानसभा अध्यक्षाची निवड करण्याचा मार्ग लवकरच मोकळा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पटोले यांच्या दिल्ली भेटीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

महाविकास अाघाडी सरकारमध्ये काँग्रेसच्या वाट्यास १२ मंत्रिपदे असून त्यातील दोन मंत्र्यांना डच्चू देऊन नव्यांना संधी देण्याची तयारी होत आहे. पटोले यांनाही मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, पटोलेंच्या दिल्लीवारीबद्दल पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विशेष काहीही नसल्याचे म्हटले आहे. तर, त्यांच्या या दिल्लीवारीतून नेमके पुढे काय येणार की हाही पुन्हा एकदा फ़क़्त फुसका बार ठरणार, याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

कॉंग्रेस पक्षात केंद्रीय पातळीवर मोठे फेरबदल होण्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत. त्यासाठी ते दिल्लीला गेल्याच्या अटकळी लावल्या जात आहेत. राज्यात एकीकडे आक्रमक होत पटोले यांनी स्वबळावर निवडणुकीचा नारा दिला आहे. त्याचवेळी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मग त्यामुळे फटका बसण्याच्या शक्यतेने राष्ट्रवादी आणि शिवसेना सावध पावले टाकत आहेत. आगामी पुणे आणि मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला काँग्रेसच्या सोबतीची आवश्यकता असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता कॉंग्रेस आक्रमकता दाखवून आपल्या जागा आणि खुंटा मजबूत करून घेत आहे.

Advertisement

‘गुगल न्यूज’वर लाइव्ह न्यूज, लेख आणि मार्केट अपडेट वाचण्यासाठी https://bit.ly/3xX9aSV या लिंकवरून ‘कृषीरंग’ला फॉलो करा

Advertisement

Advertisement

Leave a Reply