Take a fresh look at your lifestyle.

IMP न्यूज : ‘महाविकास’मध्ये वाढल्या कुरबुरी; म्हणून पटोलेंची थेट दिल्लीवारी..?

मुंबई : सध्या देशभरात करोनाची लाट कमी पडल्याने राजकीय लाटा जोरावर आहेत. एकीकडे केंद्रात भाजपने उत्तरप्रदेश निवडणुकीसाठी रान पेटवले आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष मोर्चेबांधणी करीत आहेत. त्यातच आता कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्लीवारी केली आहे.

Advertisement

पटोलेंच्या दिल्लीवारीबद्दल पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विशेष काहीही नसल्याचे म्हटले आहे. तर, त्यांच्या या दिल्लीवारीतून नेमके पुढे काय येणार की हाही पुन्हा एकदा फ़क़्त फुसका बार ठरणार, याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. कॉंग्रेस पक्षात केंद्रीय पातळीवर मोठे फेरबदल होण्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत. त्यासाठी ते दिल्लीला गेल्याच्या अटकळी लावल्या जात आहेत.

Advertisement

राज्यात एकीकडे आक्रमक होत पटोले यांनी स्वबळावर निवडणुकीचा नारा दिला आहे. त्याचवेळी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मग त्यामुळे फटका बसण्याच्या शक्यतेने राष्ट्रवादी आणि शिवसेना सावध पावले टाकत आहेत. आगामी पुणे आणि मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला काँग्रेसच्या सोबतीची आवश्यकता असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता कॉंग्रेस आक्रमकता दाखवून आपल्या जागा आणि खुंटा मजबूत करून घेत आहे.

Advertisement

विधानसभा अध्यक्षपदही लवकर भरण्याचा काँग्रेसचा ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आग्रह असल्याचे समजते. मात्र, त्यांनी यावर सबुरीने घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच तिन्ही पक्षांतील रिक्त मंत्रिपदे एकत्रित भरण्याचा आघाडी सरकारचा विचार असून विशेष अधिवेशन घेऊन विधानसभा अध्यक्षाची निवड करण्याचा मार्ग लवकरच मोकळा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पटोले यांच्या दिल्ली भेटीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

‘गुगल न्यूज’वर लाइव्ह न्यूज, लेख आणि मार्केट अपडेट वाचण्यासाठी https://bit.ly/3xX9aSV या लिंकवरून ‘कृषीरंग’ला फॉलो करा

Advertisement

आश्चर्य घडले की..! आणि मग BEO कार्यालयातील टीव्ही आला चालत..!

Advertisement

पाकिस्तानची करामत : पोखरणवर लक्ष ठेवण्यासाठी ISI चा असाही प्लान; अटकेनंतर झाला भांडाफोड..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply