Take a fresh look at your lifestyle.

मुंबईला पावसानं झोडपलं..! पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाने काय अंदाज वर्तवलाय पाहा..?

मुंबई : मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्राची राजधानी मुंबईसह पुणे, ठाणे, पालघर परिसराला (Mumbai) मुसळधार पावसाने झोडपलं. गुरुवारी रात्रीपासून सलग दोन दिवस मुंबईत पावसानं धूमशान घातलं होतं.

Advertisement

मुंबईसह पुणे, ठाणे, पालघर, उत्तर महाराष्ट्र, घाट परिसराला हवामान खात्याने ‘येलो अलर्ट’ जारी केले आहे. याठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. आज सकाळपासून मुंबईसह ठाणे परिसरात अंशतः ढगाळ हवामान होते.

Advertisement

मुंबईत ठिकठिकाणी रस्ते तुंडुंब भरल्याने परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. परिणामी मुंबईचे जनजीवन विस्कळीत झालं होते, अनेक रस्त्यांचे मार्ग बदलण्यात आले. तसेच, मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवरही मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. त्यामुळे विमान उड्डाणाच्या वेळेत बदल करण्यात आला.

Advertisement

आज सकाळपासूनचं मुंबई अंशतः ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. असं असलं, तरी मागील दोन दिवसांच्या तुलनेत आज मुंबईत पावसाचा जोर कमी असणार आहे. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात मान्सूननं कमबॅक करत अनेक ठिकाणी जोरदार मुसंडी मारली होती. पण पावसाचा जोर एक आठवडाभरही टिकला नाही.

Advertisement

आता पुन्हा राज्यात मान्सून मंदावताना दिसत आहे. पुढील काही दिवस राज्यात अशीच स्थिती राहणार आहे. तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

Advertisement

दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. संबंधित तीन जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Advertisement

दरम्यान, आकाशात मेघगर्जनेसह वेगवान वारा वाहण्याची शक्यता आहे. यासोबतच गोवा किनारपट्टीवर देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. पुढील तीन तासांत ठाण्यासह रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस कोसळणार आहे.

Advertisement

नाना पटोललेंना NCP च्या पटेलांचा टोला; कॉंग्रेसमध्येच पाडले त्यांनी दोन गट..!
वाव.. विखेंच्या विरोधात राष्ट्रवादीला मिळाला तगडा उमेदवार; लंकेंनी सांगितलाय दक्षिणेवर हक्क..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply