Take a fresh look at your lifestyle.

सोन्या-चांदीच्या भावात घसरण, सराफ बाजारातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी वाचा..

नवी दिल्ली : गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ‘एमसीएक्स’वर सोन्याचा भाव 56200 रुपये प्रति तोळा झाले होते. तेच भाव आज MCX वर 48,255 रुपये प्रति तोळा आहेत. उच्चांकी दराच्या तुलनेत आज सोन्याचे दर प्रति तोळा 7,945 रुपयांनी स्वस्त असल्याने गुंतवणुकीची चांगली संधी आहे.

Advertisement

सोन्याच्या किंमतीत आज घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. शिवाय चांदीचे दरही कमी झाले. आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या घसरणीमुळे शुक्रवारी (ता. 16) देशांतर्गत बाजारात सोन्याचे 73 रुपयांनी कमी झाले होते.

Advertisement

एमसीएक्सवर ऑगस्टच्या डिलिव्हरीच्या सोन्याचे दर 22 रुपयांच्या घसरणीसह खुले झाले होते. त्यानंतर त्यात घसरण होत गेली. दुपारी तीन वाजता ‘एमसीएक्स’वर सोन्याचे दर 145 रुपयांनी कमी झाले होते. यानंतर याठिकाणी सोन्याचे दर 47,319 रुपये प्रति तोळ्यावर गेले होते.

Advertisement

चांदीचे दरही 196 रुपयांनी घसरुन 68,043 रुपये प्रति किलोवर पोहोचले. आधीच्या सत्रात चांदीचे दर 68,239 रुपये प्रति किलो होते.

Advertisement

एचडीएफसी सिक्योरिटीजचे सीनिअर अनालिस्ट तपन पटेल यांच्या मते दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत COMEX वरील सोन्याच्या किंमतीतील घसरणीसह 73 रुपयांच्या घसरणवर व्यवहार करत होती. दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 1,823 डॉलर प्रति औंस आहेत आणि चांदीचे दर 26.13 डॉलर प्रति औंसवर स्थिर आहेत.

Advertisement

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या दरात मोठे चढ-उतार होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या वर्षाअखेर सोन्याचे भाव विक्रमी पातळीवर पोचणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement

पेन्शनर्ससाठी आलीय गुड न्यूज; पहा केंद्र सरकार व बँकांकडून काय सोय होणारेय तुमची..!
झोमॅटोच्या आयपीओला तुफान प्रतिसाद, शेअर्सपेक्षाही जास्त मागणी.. भांडवली बाजारातील स्थिती जाणून घेण्यासाठी वाचा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply