Take a fresh look at your lifestyle.

‘आरबीआय’कडून आणखी एका बॅंकेवर कारवाई.. आर्थिक बेशिस्तीमुळे कारवाईचा बडगा उगारला..

मुंबई : आर्थिक बेशिस्ती, भरमसाठ एनपीएमुळे संकटात सापडलेल्या नागरी सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँकेकडून कठोर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. मागील वर्षभरात राज्यातील अशा अनेक बँकांचे परवाने ‘आरबीआय’कडून रद्द करण्यात आले आहेत. त्यात आणखी एका बॅंकेची भर पडली आहे.

Advertisement

रिझर्व्ह बँकेने आर्थिक संकटात सापडलेल्या लातूरमधील निलंगा येथील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द केलाय. अपुरे भांडवल आणि व्यवसाय चालू ठेवण्यास असमर्थ असल्याने ‘आरबीआय’ने बॅंकेवर ही कारवाई केली.

Advertisement

मागील काही दिवसांपासून डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर नागरी सहकारी बँकेची आर्थिक परिस्थिती बेताची बनली होती. त्यामुळे बँकेकडून व्यवसाय सुरु ठेवणे कठीण झाले होते. त्यामुळे आरबीआयने या बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे. तसेच सहकार आयुक्तांना बँकेवर लिक्विडेटर नियुक्त करून बँक गुंडाळण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत.

Advertisement

आरबीआयच्या या कारवाईमुळे डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर नागरी सहकारी बँकेला ठेवी स्वीकारणे, कर्जवाटप करणे, तसेच बँकिंग व्यवसाय सुरु ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. लवकरच बँक कायदेशीर बंद करण्याची प्रक्रिया सुरु केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

रिझर्व्ह बँकेने डिसेंबर-2020 मध्ये कोल्हापुरातील सुभद्रा लोकल एरिया बँकेचा परवाना रद्द केला होता. सुभद्रा लोकल एरिया बँकेला २०१३ मध्ये बँकिंग परवाना मिळाला होता. मात्र, काही वर्षापासून बँकेची आर्थिक स्थिती डळमळीत झाली होती. त्यामुळे आरबीआयने या बॅंकेचा परवाना रद्द करण्यात आला होता.

Advertisement

कोणीही दावा न केल्याने बॅंका, विमा कंपन्या, पीएफमध्ये धूळखात पडलाय मोक्कार पैसा, पाहा त्यात काय काय होऊ शकते..?
पंकजा मुंडेंना मोठाच झटका; पहा कशामुळे कोणती कारवाई झालीय ‘वैद्यनाथ’वर..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply

You cannot print contents of this website.