Take a fresh look at your lifestyle.

महत्वाची घडामोड : बांधली वज्रमुठ; ‘त्यासाठी’ झेडपी, पंचायत समिती सदस्य न नगरसेवक सरसावले..!

नाशिक : एकेकाळी पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद म्हणजे ग्रामीण विकासाचा धागा होत्या. त्याद्वारे लोकशाहीला नवे नेतृत्व घडवण्याची संधी मिळतानाच विकेंद्रीकरण पद्धतीने अधिकार वाटले गेल्याने नागरिकांना कामकाजात सुलभता जाणवत होती. मात्र, आता केंद्र आणि राज्य सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे या संस्था मोडकळीस येण्याची भीती निर्माण झालेली आहे. त्यांना वाचवण्यासाठी आता झेडपी, पंचायत समिती सदस्य न नगरसेवक सरसावले आहेत.

Advertisement

महाराष्ट्र जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरसेवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कैलास गाेरे पाटील यांनी नाशिक येथे अायाेजित विभागीय बैठकीत यासाठी उभ्या केलेल्या लढ्याबद्दल माहिती दिली. प्रदेशाध्यक्ष उदय बने, राज्य संघटक दिनकर पाटील, प्रदेश कार्याध्यक्षा अमृता पवार, काेकण कार्याध्यक्ष सुभाष गरत, जिल्हा परिषद सदस्या रुपांजली माळेकर, सदस्य यशवंत शिरसाठ, गाेरख बाेडके आदि यावेळी उपस्थित होते.

Advertisement
बैठकीतील महत्वाचे मुद्दे असे :
लाेकसभा व विधानसभा निवडणुकीप्रमाणेच जिल्हा परिषदेचे राजकीय अारक्षण २५ वर्षांनी बदलण्यात यावे
या सदस्यांना पूर्ववत अधिकार बहाल करावेत
ग्रामीण महाराष्ट्रात काम करणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांना स्वत:चा विकास निधी मिळावा
पदाधिकाऱ्यांना पूर्वी असलेले ५ टक्के बदल्यांचे अधिकारही शासनाने बहाल करावेत
जिल्हा परिषद सदस्यांना २० हजार तर पंचायत समिती सदस्यांना १० हजार रुपये मानधन मिळावे

 

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply