Take a fresh look at your lifestyle.

पंकजा मुंडेंना मोठाच झटका; पहा कशामुळे कोणती कारवाई झालीय ‘वैद्यनाथ’वर..!

औरंगाबाद : भाजपच्या दिग्गज नेत्या आणि पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणात एकट्या पडलेल्या पंकजा मुंडे यांना आता आणखी एक झटका बसला आहे. नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळ विस्तारत त्यांच्या गटाला डावलण्याचा झटका बसलेल्या मुंडेंना आता ‘वैद्यनाथ’च्या निमित्ताने दुसरा झटका बसला आहे.

Advertisement

मुंडे या कारखान्याच्या चेअरमन असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे (पांगरी, ता. पर‌ळी, जि. बीड) बँक खाते जप्त करून ९२ लाख रुपयांची थकबाकी वसूल केली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) औरंगाबाद विभागीय कार्यालयाने ही धडाकेबाज कारवाई केली आहे.

Advertisement

मार्च २०१८ ते ऑगस्ट २०१९ या काळातील कर्मचारी व कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरणे कारखाना प्रशासनाने टाळले होते. त्याचा मोठा फटका कारखाना कर्मचाऱ्यांना बसला होता. मात्र, तरीही वेळोवेळी मागणी करून कर्मचाऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा करण्यात प्रशासनाने स्वारस्य दाखवले नव्हते. त्यामुळे अखेरीस ही मोठी कारवाई झाली आहे.

Advertisement

एकूण १.४६ कोटी रुपये रक्कम थकीत असतानाही बँक खात्यातील शिलाकीनुसार बँक खाते जप्त करून ९२ लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आलेली आहे. उर्वरित ५६ लाख रुपयांच्या वसुलीसाठी कार्यवाही सुरू असून सर्व थकबाकीदारांनी थकीत भविष्य निधी देयकांचा त्वरित भरणा करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त जगदीश तांबे यांनी केले आहे. सहायक आयुक्त आदित्य तलवारे यांच्या आदेशान्वये प्रवर्तन अधिकारी सुधीर वानखेडे यांनी ही कारवाई केली आहे.

Advertisement

‘गुगल न्यूज’वर थेट लाइव्ह न्यूज, लेख आणि मार्केट अपडेट वाचण्यासाठी आम्हाला https://bit.ly/3xX9aSV या लिंकवरून फॉलो करा

Advertisement
Advertisement

Leave a Reply

You cannot print contents of this website.