Take a fresh look at your lifestyle.

आश्चर्य घडले की..! आणि मग BEO कार्यालयातील टीव्ही आला चालत..!

सोलापूर : सरकारी कार्यालयात अधिकारी-कर्मचारी कमी आणि लुटालूट करणारे जास्त अशीच सध्या परिस्थिती असल्याची सामाजिक भावना आहे. सरकारी विभागही ही धारणा पक्की करण्यासाठीच झटतात. असाच धक्कादायक आणि पोट धरून हसायला लावणारा प्रकार उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये घडला आहे.

Advertisement

या घटनेची आता राज्यभरात चर्चा सुरू आहे. कारण, इथे वर्षभरापूर्वी चोरीला गेलेला टीव्ही चक्क ‘त्याच्या’ पावलाने चालत येऊन कार्यालयाच्या आवारात पोहोचला आहे..! हो.. हो.. हो.. असेच घडलेले नाही. मात्र, घटना खूपच मजेशीर आणि सरकारी कार्यालयातील अनागोंदी कोणत्या थराला गेली आहे याचीच साक्ष पटवणारी आहे.

Advertisement

जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्ता साळुंके यांनी मंगळवारी (दि. १३) परंडा येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी येथील टीव्ही गेल्या वर्षी गायब झाल्याचा प्रकार समोर आला. तत्कालीन प्रभारी गटशिक्षण अधिकारी खुळे यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याने याप्रकरणी कोणतीही कार्यवाही झालेली नव्हती, अशी माहिती त्यातून पुढे आली. तर, प्रभारी गटशिक्षणाधिकारी अनिता जगदाळे यांनी त्यांनी पदभार घेताना टीव्ही नव्हता असे म्हटले.

Advertisement

मात्र, मग चर्चा आणि कारवाईची भीती यामुळे चक्रे फिरली. वर्षापूर्वी गायब झालेला एलसीडी टीव्ही अखेर गुरुवारी (दि. १५) कोणीतरी पोत्यात बांधून कार्यालयाच्या मागील भिंतीवरून दोर बांधत आत सोडण्यात आला. हा टीव्ही कोणी पळवला आणि कोणी पुन्हा आणून सोडला हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, एकूण घटनाक्रम लक्षात घेता येथील अधिकारी किंवा कर्मचारी यांचेच हे कृत्य असल्याचे म्हटले जात आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

You cannot print contents of this website.