Take a fresh look at your lifestyle.

फ़क़्त ‘हे’ करा आणि करोनाला द्या मूठमाती; केंद्र सरकारने दिलाय राज्यांना महत्वाचा फॉर्म्युला..!

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार आता फारसा राहिलेला नाही. त्यामुळे लोकांनी पुन्हा निष्काळजीपणा करत आहे. ठिकठिकाणी गर्दी, विनाकारण फिरायला जाणे, मास्क तर नकोच, असे प्रकार सुरू झाले आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका पुन्हा वाढला आहे. त्यातच आता कोरोनाचे डेल्टा, डेल्टा प्लस, कप्पा असे नवीन अवतार दाखल झाले आहेत. या नव्या व्हेरिएंटचे रुग्णही सापडत आहेत. तिसऱ्या लाटेचाही धोका आहेच, अशी भयावह परिस्थिती निर्माण होत असतानाही लोक शहाणे होण्यास तयार नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारने पुन्हा एकदा या लोकांना निर्वाणीचा इशारा दिला होता.

Advertisement

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एक फॉर्म्युला या पत्रात देण्यात आला आहे. टेस्ट, ट्रीट, ट्रॅक, लसीकरण आणि कोविड प्रोटोकॉलचे पालन या रणनितीवर राज्यांनी लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे, असे म्हटले आहे. केंद्र सरकारने हा फॉर्म्युला दिला आहे कारण, सध्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश लॉकडाऊनचे निर्बंध कमी करत आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेस हा काही हवामानाचा अंदाज आहे, असे समजू नका. लोकांना याचे गांभीर्य आणि या संबंधित जबाबदाऱ्या काय आहेत हेच कळेनासे झाले आहेत. आपणास आजही सतर्क राहणे गरजेचे आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले होते.

Advertisement

कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असल्याने लॉकडाऊनचे निर्बंध कमी होत आहेत. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येत आहे. मात्र, यामुळे लोकांचा निष्काळजीपणा वाढत चालला आहे. मास्क वापरण्याकडे सुद्धा दुर्लक्ष होत आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी गर्दी तर धडकी भरवणारी आहे. या प्रकारांमुळे कोरोनाचा धोका पुन्हा वाढला आहे. कोरोना प्रोटोकॉलकडे असेच दुर्लक्ष होत राहिल्यास पुन्हा कठोर निर्बंध अमलात आणले जातील, असा इशारा केंद्र सरकारने याआधी सुद्धा दिला होता. मात्र, त्याचा फारसा फरक पडल्याचे दिसत नाही.

Advertisement

आश्चर्य घडले की..! आणि मग BEO कार्यालयातील टीव्ही आला चालत..!

Advertisement

‘त्या’ शिक्षकांवर होतोय अन्यायाच; केंद्राच्या धोरणालाही फसलाय हरताळ..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply