Take a fresh look at your lifestyle.

पेन्शनर्ससाठी आलीय गुड न्यूज; पहा केंद्र सरकार व बँकांकडून काय सोय होणारेय तुमची..!

मुंबई : पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार गेल्या महिन्यात पेन्शन देणाऱ्या बँकांच्या केंद्रीय पेन्शन वितरण केंद्राची एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत पेन्शनधारकांच्या पेन्शनबाबत आढावा घेण्यात आला. याच बैठकीत पेन्शनधारकांना मोबाइस एसएमएस आणि ई मेल बरोबरच व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पेन्शन स्लीप पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. बँकांनी सुद्धा या पद्धतीने पेन्शनची माहिती देण्यास संमती दर्शवली आहे. त्यामुळे आता लवकरच पेन्शनधारकांना व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पेन्शन संदर्भात माहिती मिळणार आहे.

Advertisement

Advertisement

केंद्र सरकारने पेन्शनधारकांना दिलासा देणारा निर्णय घेतला असून त्यांचे एक मोठे टेन्शन दूर केले आहे. होय, आता देशातील बँका लवकरच पेन्शनधारकांना त्यांच्या पेन्शनची स्लीप व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पाठवण्यास सुरुवात करणार आहे. सध्या बँका ई मेल आणि एसएमएसच्या माध्यमातून पेन्शनधारकांना पेन्शनची माहिती देत आहेत. आता मात्र व्हॉट्सअॅपद्वारे पेन्शनची माहिती मिळणार आहे. केंद्र सरकारच्या आदेशानंतर बँकांनी व्हॉट्सअॅपद्वारे पेन्शन स्लीप पाठवण्याची तयारी दर्शवली आहे.

Advertisement

पेन्शनधारकांना दरमहा पेन्शन मिळते. पेन्शन त्यांच्या बँक खात्यात जमा होते. काही वेळेस ठरलेल्या तारखेस जमा होते तर बऱ्याचदा उशीरा जमा होते. त्यामुळे पेन्शनबाबत माहिती कशी मिळणार असा प्रश्न कायमच विचारण्यात येतो. पेन्शनची सविस्तर माहिती मिळण्यासाठी बँका ई मेल किंवा एसएमएसचा वापर करतात. एसएमएस मध्ये सविस्तर माहिती मिळत नाही. तर प्रत्येकाकडेच ई मेल याची खात्री नाही. ग्रामीण भागात या समस्या कायमच जाणवतात. येथे इंटरनेटचीही समस्या आहेच. त्यामुळे पेन्शनबाबत सविस्तर माहिती मिळण्यात बऱ्याचदा अडचणी येतात. आता मात्र ही अडचण काही प्रमाणात का होईना कमी होणार आहे. आज प्रत्येकाकडे स्मार्ट फोन आहे. व्हॉट्सअॅप नाही असे होत नाही. पेन्शनधारकांकडेही आता स्मार्टफोन आहेत. त्यामुळे आता त्यांना थेट व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पेन्शन स्लीप मिळणार आहे. या स्लीपमध्ये संबंधित पेन्शनधारकास त्याच्या पेन्शनची आणि बँक खात्यातील रकमेची सविस्तर माहिती मिळणार आहे.

Advertisement

GST परताव्यात भेदभाव; पहा मोदी सरकारकडून नेमके काय केले जातेय, काँग्रेसचा गंभीर आरोप

Advertisement

अन दहावी नापास भामट्याने लावला पोलीस-वकिलांनाच चुना; पहा कुठे घडलाय ‘हा’ प्रकार

Advertisement
Advertisement

Leave a Reply