Take a fresh look at your lifestyle.

सोन्याला आली पुन्हा झळाळी, चांदीनेही खाल्लाय भाव, डाॅलरची अवस्था जाणून घेण्यासाठी वाचा..

नवी दिल्ली : दिल्लीतील सराफा बाजारात आज (15 जुलै) सोन्याचे दर वधारले आहेत. चांदीलाही चांगली झळाळी मिळाल्याचे पाहायला मिळाले. आधीच्या सत्रात सोन्याचे दर  47,266 रुपये प्रति तोळ्यावर गेले होते. बाजार बंद होताना चांदीचे दर 68,194 रुपये प्रति किलोवर पोहोचले. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याने भाव खाल्ला; मात्र चांदीच्या दरात विशेष बदल झाला नाही.

Advertisement

दिल्लीतील सराफा बाजारात गुरुवारी (ता.15) सोन्याच्या दरात 177 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे 99.9 ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर 47,443 रुपये प्रति तोळा झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढून 1,831 डॉलर प्रति औंस झाले.

Advertisement

चांदीच्या किंमतीतही आज मोठी तेजी पाहायला मिळाली. दिल्लीतील सराफ बाजारात गुरुवारी चांदीच्या दरात किरकोळ 83 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदीचे दर प्रति किलो 68,277 रुपयांवर पोहोचले. आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र चांदीचे दर 26.30 डॉलर प्रति औंस राहिले.

Advertisement

डॉलर कमजोर झाल्याने सोन्याचे दर वाढले. अमेरिकन बाँड यील्डमध्येही घसरण झाल्याचा परिणाम झाला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती वाढत असल्याचे एचडीएफसी सिक्‍योरिटीजचे सीनियर अनालिस्‍ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले.

Advertisement

सरकारी सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी
दरम्यान, सोन्याच्या किंमती वाढत असताना, उद्यापर्यंत (ता.16) सरकारी सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी आहे. सरकारच्या सार्वभौम गोल्ड बाँड योजना सबस्क्रिप्शनसाठी 16 जुलै 2021 पर्यंत खुली आहे.

Advertisement

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या मते, सोव्हर्न गोल्ड बाँड योजना 2021-22 मालिका IV ची किंमत प्रति ग्रॅम 4,807 रुपये आहे. रिझर्व्ह बँक भारत सरकारच्या (भारत सरकार) च्या सल्ल्यानुसार ऑनलाईन अर्ज करणाऱ्या आणि डिजिटल पद्धतीने पैसे देणाऱ्या गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम 50 रुपये सूट मिळेल. अशा गुंतवणूकदारांची इश्यूची किंमत प्रति ग्रॅम सोने 4,757 रुपये असेल.

Advertisement

श्रीरामपुरात सापडले घबाड..! घराच्या खोदकामात चांदीच्या नाण्यांनी भरलेला हंडा सापडला.. पाहा पुढे काय झालं..?
महत्वाची माहिती : वाचा दहावीच्या निकालाविषयी सर्वकाही एकाच क्लिकवर

Advertisement
Advertisement

Leave a Reply