Take a fresh look at your lifestyle.

मुजोर तालिबानी भडकले आणि त्यांनी देशांना दिलीय ‘अशी’ धमकी; पहा काय म्हटलेय त्यांनी

दिल्ली : भारत-पाकिस्तान मुद्द्यामध्ये हकनाक नाक खुपसणाऱ्या तुर्कस्तान देशाने आता अफगाणिस्तान देशातही लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अफगाणिस्तानाचा बहुतांश भाग ताब्यात घेतलेल्या तालिबानी अतिरेक्यांनी तुर्कीला कडक धमकी दिली आहे. काबुल विमानतळाची सुरक्षा घेण्याचा तुर्कीचा हेतू असल्याचे स्पष झाल्यावर तालिबान्यांनी त्यास विरोध दर्शवला आहे.

Advertisement

तालिबान म्हणाले आहेत की, तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगन यांनी अमेरिकेच्या इशाऱ्यावर ही घोषणा केली आहे. ज्यामुळे आमचे आणि तुर्कीमधील द्विपक्षीय संबंध याचेही नुकसान होईल. अफगाणी भूमीवर आम्ही कोणत्याही परदेशी सैन्याला देश ताब्यात घेणारे मानतो.

Advertisement

तालिबानचे प्रवक्ते सुहेल शाहीन म्हणाले की, काबुल विमानतळावर तुर्क सैन्य तैनात करण्याचा निर्णय तुर्कीने घेतलेला निर्णय “छोटे पाऊल” होता. मात्र, हा निर्णय आमच्या देश, राष्ट्रीय सार्वभौमत्व आणि प्रादेशिक सुरक्षेविरोधात आहे. देशात कोणत्याही परकीय सैन्यांची उपस्थिती आक्रमकता मानली जाईल. आणि त्याला कठोर प्रत्युत्तर दिले जाईल. आम्ही कोणा दुसर्‍या बाबतीत हस्तक्षेप करत नाही आणि कोणालाही आमच्या बाबतीत हस्तक्षेप करू देत नाही. जर तुर्की प्रशासनाने आपल्या या वृत्तीवर फेरविचार केला नाही तर तालिबान आणि अफगाण लोक याविरोधात ठाम उभे राहतील.

Advertisement

यापूर्वी असे वृत्त होते की तुर्की आणि अमेरिकेने काबुल विमानतळाची सुरक्षा हाताळण्यासाठी करार केला आहे. इतकेच नव्हे तर अफगाण नागरी विमानन कंपनीने म्हटले होते की, तालिबानी हल्ल्यांना योग्य उत्तर देण्यासाठी हमीद करझाई विमानतळावर नवीन संरक्षण यंत्रणा बसविण्यात आली आहे. तत्पूर्वी तुर्कीने परकी सैन्याने माघार घेतल्यानंतर काबुल विमानतळाच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान आणि हंगेरीची संयुक्त मोहीम तैनात करण्याचा प्रस्ताव दिला होता. तुर्कीचे अध्यक्ष म्हणाले की, काबूल विमानतळाच्या सुरक्षेची काळजी अमेरिकेने घ्यावी अशी इच्छा असेल तर आम्हाला त्यास राजनैतिक, साहित्यिक व आर्थिक मदत पुरवावी लागेल.

Advertisement

Advertisement

Leave a Reply