Take a fresh look at your lifestyle.

महत्वाची माहिती : वाचा दहावीच्या निकालाविषयी सर्वकाही एकाच क्लिकवर

मुंबई : राज्यातील दहावीचा निकाल उद्या शुक्रवार दि. 16 जुलै रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी याबाबत माहिती दिल्याने उद्याच्या ऐतिहासिक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ.10 वी ) परीक्षा सन 2021 साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण  http: //result.mh-ssc.ac.in  या सकेतस्थळावर उपलब्ध होतील व या माहितीची प्रत (प्रिंट) घेता येईल. मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ http: //result.mh-ssc.ac.in असे आहे. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळाना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

Advertisement

दि.28 मे, 2021 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार सन 2021 माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेस श्रेणीसुधार योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आलेला नाही. या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधींमध्ये या परीक्षेची गणना करण्यात येणार नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुढील एक/दोन संधी उपलब्ध राहतील.

Advertisement

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत सन 2021 मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर जाहीर करण्यात येणार आहे.

Advertisement

इयत्ता दहावीत एकूण मुले- 9 लाख 9 हजार 931 प्रविष्ट होते, तर मुली -7 लाख 78 हजार 693  असे एकूण- 16 लाख 58  हजार 624 विद्यार्थी  प्रविष्ट होते.  एकूण  आठ माध्यमानुसार विद्यार्थी प्रविष्ट आहेत. राज्य मंडळ स्तरावर दि.3 जुलै 2021 ते दि. 15 जुलै, 2021 अखेर या दरम्यान मंडळामार्फत निकाल तयार करण्याची कार्यवाही करण्यात आली.

Advertisement

‘झोमॅटो’च्या आयपीओला तुफान प्रतिसाद, शेअर्सपेक्षाही जास्त मागणी.. भांडवली बाजारातील स्थिती जाणून घेण्यासाठी वाचा..

Advertisement

देशात उद्धव ठाकरेच ‘नंबर वन’ मुख्यमंत्री..! सर्व्हेक्षणात आली धक्कादायक माहिती समोर.. पाहा तर खरं..

Advertisement
Advertisement

Leave a Reply