Take a fresh look at your lifestyle.

रोहित पवारांनी मोदींना करून दिलीय ‘त्याची’ही आठवण; पहा DA च्या मुद्द्यावर काय म्हटलेय त्यांनी

पुढे : केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 11 टक्के वाढवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मोठे गिफ्ट दिलेले आहे. ऐन करोना संकटात त्यामुळे या नोकरदारांना अच्छे दिन आल्याची अनुभूती झालेली आहे. मात्र, त्याचवेळी सामान्य जनतेच्या मुद्द्याकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा मुद्दा राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी छेडला आहे.

Advertisement

Advertisement

त्यांनी म्हटले आहे की, दरमहा वेतन मिळतं त्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा DA घसघशीत २८% केल्याबद्दल केंद्र सरकारचं अभिनंदन! पण सामान्यांचं काय? महागाईची झळ सोसणाऱ्या या वर्गालाही दिलासा देण्याची गरज आहे. त्यांना महागाई भत्ता देता येत नाही तर किमान इंधन व खाद्यतेलाचे दर कमी करुन तरी दिलासा द्यावा!

Advertisement

रोशन देशपांडे यांनी यावर रोहित पवार यांना आठवण करून देताना म्हटलेय की, जामखेड नगरपरिषदेद्वारे घरपट्टी आणि पाणीपट्टी वर लावले जाणारे चक्रवाढ व्याज माफ करण्यात यावे. आधीच कोरोना मुळे आर्थिक परिस्थिती खराब असताना नगरपरिषदेने सावकारी व्याज लावणे चुकीचे आहे. आपण लक्ष घालाल अशी अपेक्षा आहे. अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय नाही. आपणही जामखेड नगरपरिषदेत लक्ष घालुन सामान्यांना दिलासा द्यावा. व सावकारी व्याज कमी करावे.

Advertisement

तर, शोयब यांनी लिहिलेय की, इतर सर्व महामंडळाला 7 वा वेतन आयोग लागू केला , एसटी कर्मचाऱ्याला भातात सर्वात कमी वेतन आहे, कित्येक आत्महत्या झाल्या, पवार साहेबांनी एसटी च्या अधिवेशनात वचन दिले 1 लाख कर्मचाऱ्याला वेतन आयोगाचे निवडणुक जाहीरनाम्यात नमूद आहे मुंडे यांनी मागणी केली होती अन्याय का हा?

Advertisement

‘या’ कंपनीकडून कधीच करू नका विमा; ‘त्या’ कारणावरून IRDAI ने नोटीस बजावली

Advertisement

मुजोर तालिबानी भडकले आणि त्यांनी देशांना दिलीय ‘अशी’ धमकी; पहा काय म्हटलेय त्यांनी

Advertisement
Advertisement

Leave a Reply