Take a fresh look at your lifestyle.

आणि रशियाने दिलाय अमेरिकेलाही झटका; पहा नेमके काय चालू आहेत शीतयुद्धाच्या मैदानात

दिल्ली : सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर जगातील शीतयुद्ध संपले असे वाटत असतानाच आता मागील काही वर्षांपासून रशिया, चीन आणि अमेरिका या तीन बड्या राष्ट्रांमध्ये तणावजन्य व्यवहार चालू आहेत. आताही रशियाने अमेरिकेला झटका देण्याचे कृत्य केले आहे.

Advertisement

रशियन एअर फोर्सच्या मिग 31 आणि सुखोई एस 35 लढाऊ विमानांनी आता बेअरिंग समुद्रावर उड्डाण करणाऱ्या तीन यूएस एअरफोर्स बी 52 एच बॉम्बरला बाहेर खिदाडले आहे. रशियन लढाऊ विमानांनी अमेरिकन विमानाचा पाठलाग केला होता. गेल्या 8 दिवसातील ही तिसरी घटना आहे. रशियन सैन्याने सांगितले की, सीमेजवळ तीन अमेरिकन बी 52 बॉम्बरच्या देखरेखीसाठी चार लढाऊ विमान पाठविण्यात आले होते.

Advertisement

रशियन संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या वृत्तानुसार, रडारवर नजर ठेवणाऱ्या रशियन हवाई दलास बेरिंग समुद्राच्या आंतरराष्ट्रीय सीमेच्या पाण्यात तीन हवाई लक्ष्य आढळले. ही विमाने रशियन एअरस्पेसच्या अगदी जवळ उडत होती. त्यानंतर रशियन राष्ट्रीय संरक्षण नियंत्रण केंद्राने हवाई लक्ष्ये ओळखण्यासाठी आणि रशियन हवाई क्षेत्रामध्ये अवैध प्रवेश रोखण्यासाठी मिग 31 आणि पूर्व सैन्य जिल्ह्यातील हवाई संरक्षण दलाच्या एसयू 35 सैनिकांना रवाना केले होते.

Advertisement

अमेरिकेचे बोईंग पी 8 पोझेडॉन याला पाणबुडीचा कर्दनकाळ मानले जाते. ही विमाने पाणबुडी आणि पृष्ठभागावर युद्ध करण्यास सक्षम आहेत. लांब अंतरावर समुद्रात गस्त घालण्यामुळे अमेरिकेने ती जगभरात तैनात केली आहे. त्याची ऑपरेटिंग श्रेणी 1,200 नाविक मैल आहे. या विमानाचा कमाल वेग ताशी 907 किलोमीटर आहे. रडार सज्ज असलेले हे विमान कोणत्याही प्रकारच्या जोखमीशी सामना करण्यास सक्षम आहे. यात धोकादायक हार्पून ब्लॉक 2 क्षेपणास्त्रे, एमके 55 अशी वजनाने कमी मात्र लक्ष्य नष्ट करणारे शास्त्र घेऊन उडते.

Advertisement

मुजोर तालिबानी भडकले आणि त्यांनी देशांना दिलीय ‘अशी’ धमकी; पहा काय म्हटलेय त्यांनी

Advertisement

भयंकरच की.. ‘त्यामुळे’ आहे तब्बल १०० कोटी जनतेला धोका; भारतासह शेजारील देशही प्रभावित

Advertisement
Advertisement

Leave a Reply