Take a fresh look at your lifestyle.

नोकर भरतीबाबत मुंबई मेट्रोने दिलीय महत्वाची माहिती; वाचा आणि फसवणूक टाळा

मुंबई : नोकरी हा सध्या मोठाच मुद्दा बनला आहे. त्यासाठी काहीही देण्याची तयारी ठेऊन अनेकजण नोकरीसाठी अनेकांचे उंबरठे झिजवत असतात. याच नोकरींच्या दुर्मिळत्वामुळे आता फसवणुकीचे जाळे ही सामान्य बाब बनत चालली आहे. आता मुंबई मेट्रोमध्ये नोकर भरतीचे असेच रॅकेट उघडकीस आलेले आहे. त्यामुळे नोकरभरतीबाबत मेट्रोवाल्यांनी महत्वाचे ट्विट केले आहे.

Advertisement

मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन यांनी म्हटले आहे की, मुं. मे. रे. कॉ. च्या नावाने काही समाजकंटकांकडून बनावट नियुक्तीपत्रे दिली जात आहेत. जनतेला विनंती की त्यांनी अशा बनावट नियुक्तीपत्रांना बळी पडू नये. मुं. मे. रे. कॉ. भरती प्रक्रियेच्या कुठल्याही टप्प्यावर कोणत्याही उमेदवाराकडून शुल्क मागत नाही.

Advertisement

तसेच या फसवणुकीच्या बनावट नियुक्तीचे पत्र जगजाहीर करतानाच मेट्रोने पुढे म्हटले आहे की, भरतीबाबत नियमित माहितीसाठी मुं. मे. रे. कॉ. चे अधिकृत संकेतस्थळ mmrcl.com तपासत रहा.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply