Take a fresh look at your lifestyle.

‘गुगल मीट’वर मीटिंगसाठी आता पैसे लागणार, फ्रि अनलिमिटेड ग्रुप काॅलिंग सेवा बंद, पाहा किती पैसे लागणार..?

कोरोना संकटामुळे सध्या अनेक जण वर्क फ्राॅम होम करीत आहेत. बऱ्याच कंपन्यामध्ये कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधण्यासाठी गुगल मीट या सेवेचा वापर करण्यात येतो. गेल्या काही दिवसांपासून या सेवेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे. आतापर्यंत ही सेवा मोफत मिळत होती, मात्र आता त्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. कारण गुगलने त्यांची फ्रि अनलिमिटेड ग्रुप काॅलिंग सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

गुगलने गेल्या वर्षीच म्हणजे 30 सप्टेंबर 2020 मध्येच ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कोरोना महामारीमुळे गुगलने ही सेवा जून-2021 पर्यंत वाढविली होती. कोरोना काळात अनेक जण घरुनच काम करीत होते. ही संधी साधून जास्तीत जास्त ग्राहक मिळविण्यासाठी, तसेच झुम, स्काईप यांसारख्या कंपन्यांना मागे टाकण्यासाठी गुगलने हा निर्णय घेतला होता.

Advertisement

दरम्यान, आता गुगलने ही मोफत सेवा देणे बंद करण्याचे ठरविले आहे. गुगल मीटवर आता यापुढे फक्त एक तासच मोफत सेवा मिळणार आहे. त्यानंतर ही सेवा आपोआप बंद होणार आहे. एक तासापेक्षा अधिक वेळ सेवा हवी असल्यास ग्राहकांना आता पैसे मोजावे लागणार असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

गुगल मीटसाठी अपग्रेड खर्च दर महिन्याला 750 रुपये येणार आहे. हा पॅक सध्या अमेरिका, कॅनडा, मॅक्सिको, ब्राझिल, जपानमध्ये सुरु करण्यात आला आहे. हा अपग्रेड प्लॅन घेतल्यावर 24 तास सेवेचा लाभ घेता येणार आहे. मात्र, गुगल मीटवर वन ऑन वन काॅल नेहमीप्रमाणेच 24 तासांसाठी फ्रि असणार आहे.

Advertisement

गुगल मीटिंग सुरु करण्यासाठी युजर्सला गुगल अकाऊंटसचा वापर करावा लागेल. युजर्सने ई-मेल आयडी टाकल्यावर थेट meet.google.com वर साइन करता येईल. मीटिंगमध्ये जास्तीत जास्त 100 लोकांना एकाच वेळी सहभागी होता येणार आहे.

Advertisement

पुरुष गुगलवर काय शोधतात..? संशोधनातून आली धक्कादायक माहिती, जाणून घेण्यासाठी वाचा..
UP च्या गुप्ता बंधुंच्या ‘त्या’ कारनाम्याने तब्बल 13 लाख भारतीयांवर संकट; पहा कशी आणि कुठे घडलीय ही घटना

Advertisement
Advertisement

Leave a Reply