Take a fresh look at your lifestyle.

नगर जिल्ह्यातील ‘त्या’ MIDC बाबतच्या हालचाली वेगात; पहा काय झालीय मुंबईत बैठक

अहमदनगर : जिल्ह्याच्या दक्षिण भागात अहमदनगर आणि सुपा (पारनेर) या दोन औद्योगिक वसाहती आहेत. त्यापैकी अहमदनगर औद्योगिक वसाहतीची स्थानिक राजकारण्यांनी वाट लावली आहे. तर, डेव्हलपमेंट स्थितीत असलेल्या सुपा वसाहतीमध्येही काही अडचणी आहेत. अशावेळी नगरच्या दक्षिणेत कर्जत औद्योगिक वसाहतीसाठी राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार आग्रही आहेत.

Advertisement

या कर्जत-जामखेड मतदारसंघात एमआयडीसी होण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यासाठी रोहित पवार पाठपुरावा करीत आहेत. त्याबद्दल आज मुंबईत एक महत्वाची बैठक झाली आहे. त्या बैठकीबाबत रोहित पवार यांनी ट्विटरवर माहिती दिली आहे. त्यामुळे येथील औद्योगिक वसाहतीचा मार्ग लवकरच खुला होण्याचे वेध दक्षिण नगर जिल्ह्याला लागलेले आहेत.

Advertisement

Advertisement

रोहित पवार यांनी म्हटले आहे की, माझ्या मतदारसंघात तत्वतः मंजूर झालेल्या एमआयडीसी बाबत उद्योगमंत्री सुभाष देसाई साहेब यांनी घेतलेल्या आढावा बैठकीला उपस्थित होतो. यावेळी आजवर झालेल्या कामाच्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला, तसंच अधिकाऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर सूचना दिल्या.

Advertisement

दरम्यान, त्यांनी भाजपवर टीका करताना म्हटले आहे की, उठ-सूट सरकारवर टीका करणाऱ्या भाजपला या बातमीने आनंद होणार नाही, पण त्यांनी दुःख वाटून घेऊ नये. विशेषत: ज्या उत्तर प्रदेश सरकारचं भाजपकडून नेहमी गुणगान केलं जातं तेथील मुख्यमंत्र्यांचा या सर्वेक्षणात तब्बल पाचवा क्रमांक आहे, हे त्यांनी विसरु नये! आता यावर भाजप काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

रेशन दुकानात हेलपाटे मारण्याची झंझट नाही, आता एटीएमद्वारे मिळणार धान्य, पाहा कोणी सुरु केलाय हा अनोखा उपक्रम..?

Advertisement

‘महाराष्ट्राची मास्टरशेफ’ स्पर्धा.. पर्यटन विभागाचा अनोखा उपक्रम, सहभागी होण्यासाठी काय कराल..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply