Take a fresh look at your lifestyle.

रेशन दुकानात हेलपाटे मारण्याची झंझट नाही, आता एटीएमद्वारे मिळणार धान्य, पाहा कोणी सुरु केलाय हा अनोखा उपक्रम..?

नवी दिल्ली : आतापर्यंत आपण विविध बॅंकांच्या एटीएममधून (ATM) फक्त पैसे काढले असतील, पण आता आपल्याला एटीएममधून धान्यदेखील काढता येणार आहे. हरियाणातील गुरुग्राममध्ये देशातला पहिला ‘ग्रेन एटीएम’ (Grain ATM) पायलट प्रोजेक्ट स्वरूपात सुरू करण्यात आला आहे.

Advertisement

हरियाणाचे मुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी सांगितले, की एटीएममधून एका वेळी अवघ्या 5-7 मिनिटांत तब्बल 70 किलो धान्य काढता येईल. ग्राहकांना आता धान्य  घेण्यासाठी सरकारी शिधावाटप दुकानांसमोर रांगा लावण्याची गरज नाही. कारण गाहकांना आता  ‘ग्रेन एटीएम’द्वारे धान्य  उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Advertisement

हरियाणातील गुरूग्राम जिल्ह्यात पहिल्यांदा पायलट प्रोजेक्ट्च्या माध्यमातून देशातील हा पहिले ‘ग्रेन एटीएम’ सुरू करण्यात आले आहे. चौटाला यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा विभागाचीही जबाबदारी आहे.

Advertisement

ते म्हणाले,  की ”ग्रेन एटीएम’मुळे रेशनच्या प्रमाणात, वेळेचे अचूक मोजमाप केले जाईल. संबंधित सर्व तक्रारींचे निवारण केले जाईल. ‘ग्रेन एटीएम’मुळे ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे; पण शिधावाटप दुकानांमध्ये धान्य उपलब्ध आहे की नाही, ग्राहकांची ही चिंता देखील दूर होणार आहे.”

Advertisement

पूर्वीच्या तुलनेत सार्वजनिक अन्नवितरण प्रणालीत अधिक पारदर्शकता येणार आहे. गुरुग्राम जिल्ह्यातील फर्रुखनगर येथे हा पायलट प्रकल्प यशस्वीरित्या सुरु झाल्यावर राज्यभरातील सरकारी शिधावाटप दुकानांमध्ये ‘ग्रेन एटीएम’ बसविण्याची योजना असल्याचे चौटाला यांनी सांगितले.

Advertisement

मापात पाप करणाऱ्या रेशन दुकानदारांना बसणार चाप, मोदी सरकारने केलाय हा नवा नियम..!
काँग्रेसने हाणलाय फडणवीसांना ‘त्या’प्रकरणी टोला; शेतीबाबत दिली ती आठवण करून

Advertisement
Advertisement

Leave a Reply