Take a fresh look at your lifestyle.

‘एलआयसी’ ‘आयपीओ’साठी मोदी सरकारचे मोठे निर्णय, एलआयसीचे ग्राहकही होणार मालामाल..

नवी दिल्ली : मोदी सरकारने देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या एलआयसी (LIC-Life Insurance Corporation of India) चा आयपीओ (IPO) आणणार असल्याची घोषणा केली होती. त्या दृष्टीने आता केंद्र सरकारने आता पावले टाकण्यास सुरवात केली आहे.

Advertisement

एलआयसीचा आयपीओ आणण्यासाठी सरकारच्या निर्गुंतवणूक विभागाने कायदेशीर सल्लागार नियुक्तीसाठी अर्ज मागविले आहेत. अर्ज सादर करण्यासाठी 6 ऑगस्ट 2021 पर्यंत मुदत आहे. गुंतवणूक, सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने जानेवारी 2021 मध्ये ‘अ‍ॅक्ट्युरियल फर्म मिलिमॅन अ‍ॅडव्हायझर्स एलएलपी इंडिया’ची नियुक्ती केली होती. हा आयपीओ भारतीय कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ असण्याची चिन्हे आहेत.

Advertisement

सरकारने मागील 3 दिवसांत एलआयसी आयपीओसंदर्भात दोन मोठे निर्णय घेतले. केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी एलआयसीचा आयपीओ आणण्यास मान्यता दिली. मात्र, तो कधी आणायचा, याचा निर्णय झालेला नाही. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखालील समिती या आयपीओचा आकार आणि किमतीबाबतचा निर्णय घेणार आहे. तसेच आयपीओ कधी आणायचा, हेदेखील समिती ठरविणार आहे.

Advertisement

निर्गुंतवणूक विभागाने कायदेशीर सल्लागारांच्या नियुक्तीसाठी अर्ज मागविले असून, त्यासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 6 ऑगस्ट 2021 आहे.

Advertisement

एलआयसी आपल्या ग्राहकांसाठी आयपीओमध्ये स्वतंत्र कोटा निश्चित करू शकते. इश्यूचा आकार 10% पॉलिसीधारकांसाठी राखीव ठेवला जाऊ शकतो, असे संसदेच्या अधिवेशनात केंद्रिय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले होते.

Advertisement

इंग्रजी वृत्तपत्र ‘फायनान्शियल टाईम्स’च्या वृत्तानुसार, एलआयसीचा आयपीओ 2021-22 च्या अखेरीस म्हणजेच 31 मार्च 2021 पर्यंत येऊ शकेल. आयपीओच्या जास्तीत जास्त 10 टक्के आकार पॉलिसीधारकांसाठी राखीव असतील. प्रस्तावित आयपीओसाठी सरकारने यापूर्वी आवश्यक कायदेशीर बदल केले आहेत.

Advertisement

डिलॉईट आणि एसबीआय कॅप्सची प्री-आयपीओ व्यवहार सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षात निर्गुंतवणूक आणि खासगीकरणाच्या माध्यमातून 1.75 लाख कोटी रुपये उभे करण्याचे लक्ष्य ठेवल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

अर्रर्रर्र..एलआयसीने 8 कंपन्यांमधील सगळा हिस्सा विकला, आता तुमच्या पैशाचं काय..?
बदलला की मार्केट ट्रेंड; पहा काय चालूये सोन्याच्या बाजारात, आज झाली ‘इतकी’ वाढ..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply