Take a fresh look at your lifestyle.

श्रीरामपुरात सापडले घबाड..! घराच्या खोदकामात चांदीच्या नाण्यांनी भरलेला हंडा सापडला.. पाहा पुढे काय झालं..?

अहमदनगर : जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे जुन्या घराचे खाेदकाम करताना गुप्तधन सापडले. तब्बल हंडाभर चांदीची नाणी सापडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, राजेश खटोड यांनी ही नाणी सरकारजमा केली आहेत.

Advertisement

बेलापुर येथील व्यापारी राजेश खटोड यांच्या घराचे खोदकाम सुरू असताना अचानक जड वस्तू हाताला लागली. कामगारांनी माती बाजूला सारून पाहिले असता, भला मोठा हंडा आढळून आला. तो उघडून पाहिल्यावर अनेकांना सुखद धक्का बसला.

Advertisement

हंड्यात चांदीची 11 किलो वजनाची 1020 नाणी (silver coin) सापडली. या नाण्यांची आजच्या बाजारभावानुसार 8 लाख रुपये किंमत आहे. राजेश खटोड यांच्या आजोबांनी हा हंडा तिथे ठेवल्याचं त्यांना सांगितल होतं. त्यामुळे खोदकाम करताना शोध घेतला असता, हा हंडा त्यांना सापडला.

Advertisement

खटोड यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना याबाबत माहिती दिली. नंतर तहसीलदार प्रशांत पाटील यांनी पंचनामा करुन हा चांदीचे नाणे भरलेला हंडा ताब्यात घेतला. गावात गुप्तधन सापडल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. सोन्याने भरलेला भला मोठा हंडा सापडल्याचीही अफवा गावात पसरली होती.

Advertisement

बेलापूर येथील राजेश खटोड यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे रितसर अर्ज करुन नियमानुसार चांदी ताब्यात घेण्याची विनंती केली. त्यांना 11 किलो 6 ग्रॅम चांदी मिळुन आली. त्यात चार आणे किंमतीची 46 नाणी होती. आठ आणे किंमतीची 58 नाणी, तर दोन अरबी नाणी व एक रुपये किंमतीची 914 नाणी, अशी एकूण 1020 नाणी आढळून आली आहेत.

Advertisement

बदलला की मार्केट ट्रेंड; पहा काय चालूये सोन्याच्या बाजारात, आज झाली ‘इतकी’ वाढ..!
पुरुष गुगलवर काय शोधतात..? संशोधनातून आली धक्कादायक माहिती, जाणून घेण्यासाठी वाचा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply