Take a fresh look at your lifestyle.

‘झोमॅटो’च्या आयपीओला तुफान प्रतिसाद, शेअर्सपेक्षाही जास्त मागणी.. भांडवली बाजारातील स्थिती जाणून घेण्यासाठी वाचा..

मुंबई : घरपोच खाद्यपदार्थ पोहचवणाऱ्या ‘झोमॅटो’च्या प्राथमिक भागविक्रीस (IPO) गुंतवणुकदारांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. पहिल्याच दिवशी (ता.14) विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या समभागांपेक्षाही जास्त मागणी (Over Subscribed) नोंदविण्यात आली.

Advertisement

‘झोमॅटो’च्या 71 कोटींपेक्षा जास्त समभागांसाठी पहिल्या दिवसअखेर 75 कोटींपेक्षा जास्त मागणी आली. सामान्य गुंतवणुकदारांनी 2.69 टक्के, तर संस्थात्मक गुंतवणुकदारांनी त्यांच्यासाठी राखीव असलेल्या समभागांपैकी 98 टक्के समभागांसाठी मागणी नोंदवली.

Advertisement

अन्य बड्या गुंतवणुकदारांनी फक्त 13 टक्के, तर ‘झोमॅटो’च्या कर्मचाऱ्यांनीही फक्त 18 टक्केच मागणी पहिल्या दिवशी नोंदवली. ‘झोमॅटो’ची भागविक्री आज (शुक्रवारी) संपणार असल्याची माहिती मुंबई शेअर बाजाराच्या (BSE) वेबसाईटवर नोंदविण्यात आली आहे.

Advertisement

गेल्या आठवड्यात ‘झोमॅटो’ने ‘आयपीओ’ची घोषणा केली होती. त्यानुसार, कालपासून (ता. 14) हा ‘आयपीओ’ खुला झाला. दरम्यान, ‘झोमॅटो’ने ‘आयपीओ’साठी अवाजवी मूल्यांकन केल्याची चर्चा होती. मात्र, त्यानंतरही पहिल्याच दिवशी ‘आयपीओ’ला तुफान प्रतिसाद दिला.

Advertisement

‘आयपीओ’ खुला होताच अवघ्या सव्वा तासात किरकोळ गुंतवणूकदारांचा हिस्सा पूर्ण ‘सबस्क्राईब’ झाला. समभाग विक्री योजनेसाठी प्रती समभाग 72 ते 76 किंमतपट्टा निश्चित केला होता. गुंतवणूकदारांना किमान 195 समभागांसाठी, त्यानंतर 195 च्या पटीत अर्ज करता येणार आहे. या योजनेत किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 10 टक्के हिस्सा राखीव आहे.

Advertisement

‘आयपीओ’द्वारे 9000 कोटींचे नवीन समभाग, 375 कोटींचे समभाग विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. ‘आयपीओ’ योजनेत 65 लाख समभाग पत्र कर्मचाऱ्यांकरिता विहित प्रमाणात खरेदीसाठी राखीव ठेवण्यात येणार असून, हे प्रमाण कंपनीच्या आयपीओ पश्चात एकूण समभाग भांडवलाच्या 5 टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही.

Advertisement

9375 कोटींच्या ‘आयपीओ’मध्ये कर्मचाऱ्यांसाठी राखीव कोट्यामध्ये 5 टक्के बोली प्राप्त झाली. ‘क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर’ श्रेणीचा कोटा दुपारपर्यंत 17 टक्के ‘सबस्क्राइब’ झाला. 2020 मध्ये कंपनीला 2604.7 कोटींचा महसूल मिळाला. 2019 मध्ये कंपनीला 1312.58 कोटींचा महसूल मिळाला.

Advertisement

दरम्यान, कंपनीचा तोटाही तितकाच वाढल्याचे दिसून आले. 2020मध्ये कंपनीला 2385.6 कोटींचा तोटा झालाय. त्याआधीच्या वर्षात कंपनीला 1010.2 कोटींचा तोटा झाला होता.

Advertisement

पुरुष गुगलवर काय शोधतात..? संशोधनातून आली धक्कादायक माहिती, जाणून घेण्यासाठी वाचा..
कोणीही दावा न केल्याने बॅंका, विमा कंपन्या, पीएफमध्ये धूळखात पडलाय मोक्कार पैसा, पाहा त्यात काय काय होऊ शकते..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply