Take a fresh look at your lifestyle.

देशात उद्धव ठाकरेच ‘नंबर वन’ मुख्यमंत्री..! सर्व्हेक्षणात आली धक्कादायक माहिती समोर.. पाहा तर खरं..

मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर विरोधी पक्ष भाजपकडून मोठ्या प्रमाणात टीका केली जात असली, तरी या सरकारसाठी एक आनंदाची बातमी आलीय. ती म्हणजे ‘प्रश्नम’ या संस्थेने आपल्या त्रैमासिक अहवालात देशातील प्रमुख 13 राज्यांमधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच ‘नंबर वन’ असल्याचे म्हटले आहे. याबाबत ‘द प्रिंट’ने बातमी दिलीय.

Advertisement

देशातील एकूण लोकसंख्येच्या 67 टक्के लोक राहतात, अशी 13 राज्ये ‘प्रश्नम’ संस्थेने निवडली. त्यात बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, पंजाब, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश आहे.

Advertisement

नुकत्याच विधानसभा निवडणुका झालेल्या तमिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यांचा सर्वेक्षणात समावेश केला नव्हता. आंध्र प्रदेश, दिल्ली, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये पॅनेल नसल्यामुळे या राज्यांचाही सर्वेक्षणात समावेश करता आला नाही.

Advertisement

‘प्रश्नम’च्या सर्वेक्षणात 13 राज्यांत एकूण 17 हजार 500 लोकांनी आपलं मत नोंदवलं. विशेष म्हणजे, सर्वात मोठ्या सर्वेक्षणापैकी हे एक असल्याचा दावा केला जात आहे. या सर्वेक्षणात 3 पर्याय दिले होते.

Advertisement

1. मुख्यमंत्र्यांची कामगिरी खराब असून, ते पुन्हा मु्ख्यमंत्री म्हणून नको
2. मुख्यमंत्र्यांची कामगिरी चांगली असली, तरी पुन्हा त्यांना मत देणार नाही
3. मुख्यमंत्र्यांची कामगिरी चांगली असून, पुन्हा हेच मुख्यमंत्री हवे

Advertisement

सर्वेक्षणात सर्वाधिक पसंती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मिळाली. सुमारे 49 टक्के मतदारांनी उद्धव ठाकरे यांची कामगिरी चांगली असल्याचे मत नोंदवलंय. त्यापाठोपाठ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना 44 टक्के मते मिळाली. तिसऱ्या क्रमांकावर आहेत, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत. त्यांना 40 टक्के मते मिळाली.

Advertisement

दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याबाबत मोठ्या प्रमाणात नकारात्मक मते आली. तब्बल 60 टक्के मतदारांनी अमरिंदर सिंग यांची कामगिरी खराब असल्याचं म्हटलंय. केवळ 15 टक्के लोकांनीच त्यांच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केलं.

Advertisement

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तिरथसिंह रावत यांच्याबाबत सर्वाधिक नकारात्मक मतं नोंदविण्यात आली. त्यानंतर पंजाब आणि गुजरातचा समावेश आहे.

Advertisement

कोणीही दावा न केल्याने बॅंका, विमा कंपन्या, पीएफमध्ये धूळखात पडलाय मोक्कार पैसा, पाहा त्यात काय काय होऊ शकते..?
सरकारी नोकरी : बँकिंग क्लेरीअल केडरमध्ये 5858 पदांची भरती; वाचा अन अर्ज करा

Advertisement
Advertisement

Leave a Reply

You cannot print contents of this website.