Take a fresh look at your lifestyle.

अर्थ साक्षरता : क्रेडीट कार्डावर लोन घेताना लक्षात घ्या ‘या’ गोष्टी

पुणे : कोरोनामुळे लोकांना पैशाशी संबंधित अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत ज्यांच्याकडे क्रेडिट कार्ड आहे ते त्याच्या मदतीने आपली आर्थिक आवश्यकता पूर्ण करू शकतात. बँका क्रेडिट कार्डवर (Credit Card) कर्जाची सुविधादेखील पुरवतात. आपण देखील क्रेडिट कार्डवर कर्ज (Bank Loan) घेण्याचा विचार करत असाल तर त्यापूर्वी आपण व्याज दर (Interest rate) आणि लेट फी (Late Fee) यासारख्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

Advertisement

कार्डाच्या मर्यादेनुसार कर्ज उपलब्ध : तुमच्या कार्डाच्या मर्यादेनुसार बँक तुम्हाला पूर्व-मंजूर कर्जाची सुविधा देते. आपल्याला क्रेडिट कार्डच्या मर्यादेपेक्षा जास्त कर्ज देऊ शकत नाही. कर्जाचे व्याज दर क्रेडिट कार्डावरील व्याजापेक्षा कमी आहेत. यामध्ये व्याज दर निश्चित केला जातो. क्रेडिट कार्डासाठी व्याज दर वार्षिक 30 % इतका असू शकतो.

Advertisement

Advertisement

कर्ज वेळेवर परतफेड करा : आपण वेळेवर कर्जाची परतफेड न केल्यास टॉप-अप कर्ज मिळण्याची शक्यता कमी होते. या व्यतिरिक्त आपण वेळेवर पैसे भरले नाहीत तर ते तुमची क्रेडिट स्कोअर खराब करेल. परिणामी भविष्यात तुम्हाला कर्ज घेण्यास अडचण येईल.

Advertisement

डीफॉल्टमुळे अधिक त्रास होईल : आपण वेळेवर कर्जाचा हप्ता भरला नाही तर आपण डीफॉल्टर बनता. क्रेडिट कार्ड पेमेंटवर डीफॉल्ट करणे आणि कर्ज पेमेंट्सवर डिफॉल्ट करणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. कर्जाचे हप्ते वेळेवर न भरल्यास (डीफॉल्टिंग) कार्डधारकाच्या क्रेडिट स्कोअरवर (Cibil / Credit Score) वाईट परिणाम होतो. म्हणून कर्जाचा हप्ता वेळेवर भरणे निश्चित करा.

Advertisement

कर्जाचा कालावधी आणि प्रक्रिया शुल्क लक्षात ठेवा : क्रेडिट कार्ड कर्जासाठी प्रक्रिया शुल्क 1-5 % पर्यंत असू असते. कार्डधारक कर्जाचा कालावधी निवडू शकतो. सहसा तो जास्तीत जास्त 5 वर्षांपर्यंत असतो. तसेच प्री-क्लोजरची सुविधा यात आहे. यात कोणतेही नुकसान नाही. मात्र, आपल्याला प्री-क्लोजर शुल्क द्यावे लागेल. म्हणूनच कर्जाचा कार्यकाळ निवडण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार केला पाहिजे.

Advertisement

कर्जासाठी चांगली नोंद असणे आवश्यक : आपत्कालीन परिस्थितीत क्रेडिट कार्डधारकांना पूर्व-मंजूर कर्ज सहज मिळू शकते. तथापि, यासाठी आपल्याकडे परतावा करण्याची चांगली नोंद असावी. आपण जुने बिले वेळेवर भरले असतील तर पूर्व-मंजूर कर्जात कोणतेही दस्तऐवजीकरण आवश्यक नाही. यामुळे त्वरीत त्यावर प्रक्रिया केली जाते. कधीकधी आपल्याला काही तासांतच कर्ज मिळू शकते.

Advertisement

Advertisement

Leave a Reply