Take a fresh look at your lifestyle.

शेअर बाजारात खरेदीचा ओघ कायम.. सेन्सेक्स, निफ्टीची घोडदौड, जाणून घेण्यासाठी वाचा..

मुंबई : शेअर बाजारात आजही (बुधवारी) खरेदीचा ओघ कायम असल्याचे पाहायला मिळाले. सेन्सेक्स आणि निफ्टीमधील तेजी विस्तारतानाच दोन्ही निर्देशांकांनी आपली घोडदौड कायम ठेवली.

Advertisement

आयटी शेअरवर गुंतवणूकदारांनी भर दिल्याने आज सेन्सेक्स आणि निफ्टीलाही बळ मिळाले. बाजार बंद होताना सेन्सेक्स १३४ अंकांच्या वाढीसह ५२९०४ अंकांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ४१.६० अंकांची वाढ होऊन निफ्टी १५८५३ अंकांवर बंद झाला.

Advertisement

भांडवली बाजारात दुपारच्या सत्रात काही प्रमाणात नफावसुली दिसली. मात्र, नंतर त्यातून बाजार सावरला. ‘झोमॅटो’चा ‘आयपीओ’ आज गुंतवणुकदारांसाठी खुला झाला. अवघ्या ७५ मिनिटांत किरकोळ गुंतवणूकदारांचा हिस्सा पूर्ण सबस्क्राईब झाला. त्याचेही पडसाद बाजारावर उमटले.

Advertisement

जागतिक पातळीवर नकारात्मक संकेत असतानाही तिमाही निकालाच्या भरवशावर गुंतवणूकदारांनी खरेदीचा ओघ कायम ठेवला. आजच्या सत्रात आयटी शेअरला मोठी मागणी दिसून आली.

Advertisement

तसेच आजच्या सत्रात विप्रो, टेक महिंद्रा, इन्फोसिस, एचसीएल टेक या शेअरमध्ये वाढ झाली. शिवाय एल अँड टी, टाटा स्टील, श्री सिमेंट, आयटीसी, सिप्ला हे शेअरही तेजीसह बंद झाले.

Advertisement

मारुती सुझुकी, अदानी पोर्ट, एचयूएल, नेस्ले इंडिया, टायटन, डॉ. रेड्डी लॅब, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स, टाटा कन्झुमर या शेअरमध्ये निफ्टी मंचावर वाढ झाली. मिडकॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकात अनुक्रमे ०.२३ टक्के आणि ०.४५ टक्के वाढ झाली.

Advertisement

हॅप्पीएस्ट माइंड टेक्नाॅलाॅजी, रुट मोबाईल, सीएट, एम्फासीस, माइंड ट्री शेअरमध्ये ५ ते १० टक्के वाढ नोंदविली. अदानी टोटल गॅस, इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स, गुजरात स्टेट पेट्रोनेट, क्वेस कॉर्प, एडलवाईज फायनान्शिअल सर्व्हीसेस या शेअरमध्ये १ ते ७ टक्के घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.

Advertisement

भयंकरच की.. ‘त्यामुळे’ आहे तब्बल १०० कोटी जनतेला धोका; भारतासह शेजारील देशही प्रभावित
झोमॅटोबाबत प्रश्नचिन्ह..! आयपीओसाठी बाजारमूल्य वाढविल्याची चर्चा, उद्योजकांनी नेमका काय आक्षेप घेतलाय पाहा..

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply