Take a fresh look at your lifestyle.

आणि म्हणून युथ कॉंग्रेसने दिलाय लॉलीपॉप; पहा राजकीयदृष्ट्या काय झटका आहे हा..!

पुणे : सध्या करोना संकटात महागाईचा भडका उडालेला असतानाही केंद्र सरकार फ़क़्त करबोजा टाकून पैसे कमावण्यात मश्गुल आहे. त्यामुळे अनेक नागरिकांचे जगणे मुश्कील झालेले आहे. अशावेळी यातून दिलासा देण्यासाठी काहीही पावले उचलण्याची कार्यवाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीमने केलेली नाही.

Advertisement

उलट जुमलेबाजी आणि धार्मिक व भावनिक मुद्द्यांना साद घालून भाजप आपलेच खरे असल्याचा डांगोरा पिटत आहे. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी आता केंद्रातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसने मग महागाईच्या मुद्द्यावर आंदोलन आणि टीका सुरू केली आहे. अशावेळी महाराष्ट्रात युथ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Advertisement

यानिमित्ताने त्यांनी एक इमेज ट्विटरवर शेअर केली आहे. त्यात म्हटले आहे की, लॉलीपॉप खा, निषेध नोंदवा ! जुमल्यांचं लॉलीपॉप दिलेल्या केंद्र सरकार विरोधात अमरावती जिल्हा युवक काँग्रेसचं लॉलीपॉप वाटप !

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply