Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. करन्सी नोट छापखान्यात मनी हेस्ट..! शेकडो नोटा चोरी झाल्याने दणाणले धाबे..!

नाशिक : आपण मनी हेस्ट (Money Heist Netflix Web series) नावाची वेबसिरीज पाहिली आहे का? असेल तर हरकत नाही. कारण, ती तुम्ही कधीही पाहू शकता. त्यामध्ये दाखवला जाणारा प्रकार आता नाशिक येथील करन्सी नोट प्रेसमध्ये घडला आहे. होय, तिथून चक्क शेकडो नोटांची चोरी झाली आहे.

Advertisement

नोटा छापण्याचा छापखाना हा भारत सरकारच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे इथे मोठी सुरक्षा असते. मात्र, तरीही येथून नोटांची चोरी झाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलेला आहे. अभेद्य सुरक्षा कवच असलेल्या या ठिकाणाहून चोरी म्हणजे चोरट्यांची मजल किती मोठी असू शकते, याचीच चर्चा सुरू झालेली आहे.

Advertisement

माणूसच काय साधे चिटपाखरूही प्रवेश करू न शकणाऱ्या येथील करन्सी नोट प्रेसमधून पाचशे रुपयांच्या तब्बल ५०० म्हणजे पाच लाख रुपयांच्या रकमेची चोरी झालेली आहे. यामुळे तेलगी प्रकरणानंतर नोट प्रेस पुन्हा चर्चेत आलेले आहे.  करन्सी नोट प्रेसचे सहायक प्रबंधक (विधी) अमित सतीश शर्मा (२८) यांनी उपनगर पोलिस ठाण्यात नोटा चोरीबाबत गुन्हा दाखल केला असून प्रशासनाने या प्रकरणाबाबत काही कामगारांची चौकशी करून त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावल्याची चर्चा आहे.

Advertisement

प्रेसमध्ये बाहेरील कोणत्याही व्यक्तीला प्रवेश नसल्याने पॅकिंग बे सेक्शन, एखादा कामगार, स्टाफ किंवा सुरक्षारक्षकांपैकी कुणी ही चोरी केल्याचा संशय पोलिसांना आहे. प्रेसच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज यासाठी तपासले जाणार आहे. पोलिस उपायुक्त विजय खरात यांनी याप्रकरणी तातडीने तपास पूर्ण करण्यासाठी कार्यवाहीचे निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे आता यातून कोणता चोर सापडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply