Take a fresh look at your lifestyle.

कोणीही दावा न केल्याने बॅंका, विमा कंपन्या, पीएफमध्ये धूळखात पडलाय मोक्कार पैसा, पाहा त्यात काय काय होऊ शकते..?

नवी दिल्ली : अनेकदा एखादी व्यक्ती सरकारी योजनेत वा बँकेत पैसे गुंतवते. मात्र, अशा व्यक्तीचा अकाली मृत्यू झाल्यास त्यांच्या पैशांवर दावा सांगायला कोणीही पुढे येत नाही आणि हे पैसे असेच पडून राहतात.

Advertisement

देशातील बँका, म्युच्युअल फंडस, विमा कंपन्या आणि पीएफ निधीत असा मोक्कार पैसा पडून आहे. हा सगळा पैसा वापरून मनरेगा योजनेला निधी पुरविला, तरी केंद्र सरकार चालू आर्थिक वर्षात 8000 कोटींची बचत करु शकते. वार्षिक व्याज 6 टक्के धरले, तरी या निधीसाठी वर्षाला 4900 कोटींचे व्याज द्यावे लागेल.

Advertisement

गेल्या तीन वर्षात प्राधिकरणाने दावा न केलेल्या 18 हजार कोटीची प्रकरणे निकालात काढली. बँका, म्युच्युअल फंडस, विमा कंपन्या आणि पीएफ निधीसाठी कोणीही दावा न केलेल्या एकत्रित रक्कमेचा आकडा तब्बल 82000 कोटी रुपये आहे.

Advertisement

कोणीही दावा न केल्याने सध्या सर्वाधिक पैसा धूळखात पडलाय, तो भविष्यनिर्वाह निधीत. सुमारे 26,500 कोटी रुपये पीएफ खात्यांमध्ये पडून आहेत. पीएफच्या नियमानुसार, निवृत्तीनंतर तीन महिन्यांत पैसे न काढल्यास संबंधित पीएफ खाते बंद केले जाते. त्यावर सात वर्षांपर्यंत कोणीही दावा न केल्यास हे पैसे ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी फंडात वळते केले जातात.

Advertisement

रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार, भारतातील बँकांमध्ये आजघडीला 18,131 कोटी रुपये कोणत्याही दाव्याविना पडून आहेत. एखाद्याचे बँकखाते 10 वर्षांपेक्षा अधिक काळ वापरात नसेल, तर ते पैसे गुंतवणूकदार शिक्षण निधीत वळविले जातात.

Advertisement

देशभरातील बँकांमध्ये बंद पडलेल्या बचतखात्यांमध्ये जवळपास 5 कोटी रुपये पडून आहेत. वेगवेगळ्या आर्थिक योजनांमध्ये मॅच्युरिटीचा कालावधी उलटून गेल्यानंतरही दावा न सांगितलेल्या रक्कमेचा आकडा 4,820 कोटी रुपये इतका आहे.

Advertisement

कोणीही दावा न सांगितल्यामुळे देशातील विमा कंपन्यांकडेही तब्बल 15,000 कोटी रुपये पडून आहेत. अनेक योजनांचा कालावधी पूर्ण होऊनही या रकमेवर कोणीही दावा केलेला नाही. पैकी एकट्या एलआयसीकडेच 7 हजार कोटी रुपये पडून आहेत. म्युच्युअल फंडात गुंतवलेले 18 हजार कोटी रुपयेही अशाच प्रकारे पडून आहेत.

Advertisement

बँकांमध्ये अशा प्रकारे बराच काळ पैसे पडून असतील, तर त्याची माहिती RBI ला देणे बंधनकारक असते. तुमचेही पैसे एखाद्या जुन्या बँक खात्यात अडकले असतील, तर तुम्ही योग्य ती माहिती देऊन हे पैसे परत मिळवू शकता. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, त्याचा वारसदार बँकखात्यामधील रकमेवर दावा करु शकतो. मात्र, ही प्रक्रिया अत्यंत किचकट आहे.

Advertisement

बदलला की मार्केट ट्रेंड; पहा काय चालूये सोन्याच्या बाजारात, आज झाली ‘इतकी’ वाढ..!
सरकारी नोकरी : बँकिंग क्लेरीअल केडरमध्ये 5858 पदांची भरती; वाचा अन अर्ज करा

Advertisement
Advertisement

Leave a Reply