Take a fresh look at your lifestyle.

‘झोमॅटो’बाबत प्रश्नचिन्ह..! ‘आयपीओ’साठी बाजारमूल्य वाढविल्याची चर्चा, उद्योजकांनी नेमका काय आक्षेप घेतलाय पाहा..

नवी दिल्ली : झोमॅटो या घरपोच अन्न पुरविणाऱ्या कंपनीने नुकतीच ‘आयपीओ’ची घोषणा केली होती. आपल्या शेअर विक्रीच्या माध्यमातून कंपनीने सुमारे ९३७५ कोटी रुपयांचे भांडवल उभारण्याचे उद्दिष्ट्य ठेवले आहे. मात्र, ‘आयपीओ’साठी ‘झोमॅटो’ने ठेवलेले बाजारमूल्य अधिक असल्याची चर्चा सुरु आहे. कंपनीने त्यांचे बाजारमूल्य (indicative market value) तब्बल ६०००० कोटींचे असल्याचा दावा केला असून, त्याला काही उद्योजकांनी जोरदार आक्षेप घेतला आहे.

Advertisement

झोमॅटो कंपनी सध्या प्रचंड नुकसानीत असताना, ६०००० कोटींचे बाजारमूल्य पटत नसल्याचे भांडवली बाजारातील काही विश्लेषकांचे म्हणणे आहे. आयपीओच्या माध्यमातून झोमॅटोमधील ‘व्हेंचर कॅपिटल’ आणि ‘प्रायव्हेट इक्विटी इन्व्हेस्टर’ स्वतःच्या कर्जाचा भार किरकोळ गुंतवणूकदारावर टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचा संशय काहींनी व्यक्त केला आहे.

Advertisement

देशातील सर्व क्विक सर्व्हिस रेस्तराँच्या एकूण बाजारमूल्यांच्या बरोबर झोमॅटोचे बाजारमूल्य आहे. देशातील सर्व हॉटेल्स साखळ्यांच्या बाजारमूल्यापेक्षा झोमॅटोचे मूल्य अधिक असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या क्षेत्रातील जाणकारांनी झोमॅटोच्या मूल्यांकनावरच प्रश्न उपस्थित केले आहेत.

Advertisement

देशातील क्विक सर्व्हिस रेस्तराँचे बाजारमूल्य जवळपास ६०१७२ कोटी आहे, तर २० सूचीबद्ध हॉटेल कंपन्यांचे बाजार मूल्य ४४००० कोटी आहे. त्यामुळे तोट्यातील झोमॅटोचे बाजारमूल्य चर्चेचा विषय ठरला आहे.

Advertisement

उद्योजक हर्ष गोयंका यांनीही ट्विटरवर झोमॅटोच्या बाजारमूल्याबाबत प्रश्न उपस्थित केलाय. देशातील आघाडीच्या २० हॉटेल्सचे एकूण बाजारमूल्य ४४००० कोटी आहे. आघाडीच्या ६ क्विक सर्व्हिस रेस्तराँचे एकूण बाजार मूल्य ६०००० कोटी असताना सातत्याने तोट्यात असणाऱ्या झोमॅटोचे बाजारमूल्य ६०००० कोटी कसे, हे कोणी समजून सांगेल का?

Advertisement

हॉटेल व्यावसायिकांची शिखर संघटना असलेल्या ‘एनआरएआय’चे अध्यक्ष अनुराग कत्रियार यांनी नव्या जगतात झोमॅटोचे स्वागत आहे. जी कंपनी एक पैशाचा नफा कमवित नाही, अशा कंपनीला ‘व्हॅल्यूएबल’ कंपनी म्हणून ओळखले जात असल्याचा टोला लगावला आहे.

Advertisement

स्वस्तात सोनेखरेदीची संधी..! आरबीआयने दिलीय संधी, मग वाट कसली पाहता, करा की खरेदी..!
घरबसल्या कारलोन, कार एक्सचेंजचीही सोय.. पाहा कोणत्या कंपनीने ग्राहकांसाठी आणलीय अनोखी सुविधा..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply