Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. भयंकरच की..! ‘त्यामुळे’ मिनिटाला होतायेत 11 मृत्यू..!

मुंबई : जगात कोरोनाचे संकट निर्माण झालेले असतानाही देशांनी आपल्या सैन्यावरील खर्च आजिबात कमी केलेला नाही. महामारीच्या काळात तर हा खर्च 51 अब्ज डॉलर्सने वाढला आहे. उपासमारीचे संकट मिटवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांना आज जितक्या पैशांची गरज आहे त्यापेक्षा देशांच्या संरक्षण सिद्धतेवर खर्च होणारी ही रक्कम सहा पटींनी जास्त असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

Advertisement

अफगाणिस्तान, इथिओपिया, दक्षिण सुदान, येमेन आणि सीरिया या देशांना आज सर्वाधिक उपासमार सहन करावी लागत आहे. या सर्वच देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जाणीवपूर्वक उपासमारीचे संकट निर्माण करण्याचे प्रकार येथे सुरू आहेत. अशा परिस्थितीत नागरिक सुद्धा सुरक्षित राहू शकत नाहीत. म्हणून या संघटनेने संबंधित सरकरांना विनंती करत देशातील संघर्ष तत्काळ थांबण्यासाठी उपाययोजना करण्यास सांगितले आहे. अन्यथा पुढील दिवसात परिस्थिती अधिकच विनाशकारी होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

Advertisement

आज जगभरात कोरोना अनेक नव्या रुपात थैमान घालत आहे. दीड वर्ष उलटून गेले तरी या घातक आजाराने आपला मुक्काम कायम ठेवला आहे. आता तर नव्या रुपात हा विषाणू जास्तच धोकादायक झाला आहे. या संकटातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात जगभरातील देश असताना काही देशांना दुसऱ्या संकटांचा सुद्धा सामना करावा लागत आहे. भीषण दुष्काळ, पाणी टंचाई, बेरोजगारी, गरिबी, चक्रीवादळे यांसारख्या नैसर्गिक संकटांनी हैराण केले आहे. काही संकटे तर माणसांच्या जीवावर बेतली आहेत.

Advertisement

उपसमारीमुळे जगभरात प्रत्येक मिनिटास 11 लोक मृत्युमुखी पडत आहेत, असे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गरिबी निर्मूलनासाठी काम करणाऱ्या ‘ऑक्सफैम’ संस्थेने ‘दि हंगर वायरस मल्टीप्लाइज’ या रिपोर्टमध्ये हा खुलासा केला आहे. विशेष म्हणजे, कोविड 19 मुळे होणाऱ्या मृत्यूंपेक्षा उपासमारीने होणाऱ्या मृत्यूची संख्या जास्त आहे. कोविड 19 मुळे प्रत्येक मिनिटास सात लोकांचा मृत्यू होत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

Advertisement

ऑक्सफैम संस्थेचे अध्यक्ष एबी मैक्समैन यांनी सांगितले, की हे आकडे निश्चित धक्कादायक आहेत. आज जे लोक या संकटाचा सामना करत आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या रिपोर्टमध्ये पुढे असेही म्हटले आहे, की आजमितीस जगातील 15.5 कोटी लोक खाद्यान्नाच्या संकटाचा सामना करत आहेत. आणि हा आकडा मागील वर्षाच्या तुलनेत दोन कोटींनी जास्त आहे. यामध्ये किमान दोन तृतीयांश लोक उपासमारीने ग्रस्त आहेत, आणि या देशात सध्या सुरू असलेला सैन्य संघर्ष हाच या संकटास कारणीभूत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Advertisement

कोरोनाने निर्माण केलेली आर्थिक संकटे, देशांतील वाद आणि जलवायू परिवर्तन यामुळे जगातील जवळपास 5 लाख 20 हजार लोकांना उपासमारीच्या उंबरठ्यावर आणले आहे. कोरोनासारख्या जागतिक संकटाचा सामना करण्याऐवजी एकमेकांना त्रास देण्याचे उद्योग सध्या सुरू आहेत. याचा फटका आधीच संकटग्रस्त असणाऱ्या लाखो लोकांना बसत आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply