Take a fresh look at your lifestyle.

चीनला मोठाच झटका; पहा कशा पद्धतीने झालीय आर्थिकदृष्ट्या कोंडी..!

वॉशिंग्टन : चीनी कंपन्या आणि काही संस्था काळ्या यादीत टाकल्या जाणार असल्या तरी यांचा आकडा अमेरिकेने दिलेला नाही. या कंपन्या मानवाधिकारांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे या कंपन्या अमेरिका ब्लॅक लिस्ट करणार असल्याची माहिती आहे. कोरोना काळातील चीनच्या वागणुकीमुळे अनेक देश चीनवर नाराज आहेत.

Advertisement

त्यामुळेच कोरोना वायरस वुहान प्रयोगशाळेतुनच लीक झाल्याचा दावा केला जात आहे, काही शास्त्रज्ञांनी तसे पुरावे सुद्धा मिळाले असल्याचे सांगितले आहे. जगभरातील विविध संस्थांचे जे अहवाल येत आहेत, त्यातही हा विषाणू प्रयोगशाळेतूनच पसरल्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे. कोरोना विषाणूच्या उगमाच्या मुद्द्यावर अमेरिकेने चीनची चांगलीच कोंडी केली आहे. त्यानंतर आता व्यापाराच्या क्षेत्रातही चीनला जोरदार झटका देण्याची तयारी अमेरिकेने केली आहे. चीन सातत्याने मानवाधिकार डावलत असल्याचा आरोप करत अमेरिकेने चीनच्या आणखी १० कंपन्या आणि काही चीनी संस्थांना काळ्या यादीत टाकण्याची तयारी बायडेन प्रशासनाने केली आहे. यामुळे चीनच्या व्यापारातील वाढत्या मनमानीस आळा घालण्याचा प्रयत्न अमेरिका करत असल्याचे समजते.

Advertisement

या मुद्द्यावर अमेरिकेने चीनला थेट धमकीच दिली होती. कोरोना विषाणूच्या उगमा प्रकरणी चीनने सहकार्य केले नाही तर त्यास जगात एकटे पाडले जाईल, असे अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. त्यानुसार निर्णय घेण्यास अमेरिकेने सुरुवात केली आहे. ज्या ठिकाणी चीन मक्तेदारी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याठिकाणी अमेरिका चीनला आव्हान देत आहे. चीनला अडचणीत आणणारे निर्णय घेत आहे.

Advertisement

याआधी अमेरिकेचे विषाणू तज्ज्ञ डॉ. अँथनी फाऊची यांनी पुन्हा एकदा चीनवर संशय व्यक्त केला होता. त्यांनी एका मुलाखतीत असे म्हटले, की कोरोना विषाणू प्रयोगशाळेत तयार केलेला असू शकतो. कोरोना विषाणू प्रयोगशाळेतून लीक झाल्याचा जो दावा केला जात आहे त्यामागे सुद्धा असाच संशय आहे की हा विषाणू प्रयोगशाळेतच तयार केलेला असू शकतो. हा विषाणू एखाद्या दुर्घटनेत वुहान प्रांतातील प्रयोगशाळेतून बाहेर पडला असण्याची सुद्धा शक्यता आहे.

Advertisement

चीन तसाही विश्वासघातकीच आहे आणि जगाला याचा अनुभव सुद्धा आहे. त्यामुळे चीनचे डाव हाणून पाडण्याचा प्रयत्न अमेरिकेकडून होत आहे. उद्योग व्यापाराच्या क्षेत्रात सुद्धा चीन आता दगाबाजी करत आहे. त्यामुळे चीनच्या या कुरापतींना आळा घालण्यासाठी अमेरिकेकडून असे निर्णय घेण्यात येत आहेत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

You cannot print contents of this website.