Take a fresh look at your lifestyle.

शेअर बाजारात तेजी..! कोणत्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली, जाणून घेण्यासाठी वाचा..

नवी दिल्ली : शेअर बाजारात मंगळवारी (ता. १३) तेजीचे वातावरण पाहायला मिळाले. BSE Sensex 397.04 अंक (किंवा 0.76 टक्क्यांच्या तेजीसह) 52,769.73 वर बंद झाला. तसेच NSE Nifty 119.75 अंकांनी (किंवा 0.76 टक्क्यांच्या वाढीसह) 15,812.35 वर बंद झाला. BSE च्या 30 पैकी 21 शेअर्सची वाढ झाली. त्याचबरोबर NSE च्या निफ्टीत 50 पैकी 34 शेअर्समध्ये वाढ दिसून आली.

Advertisement

BSE वर आज ट्रेडिंग संपल्यानंतर ‘आयसीआयसीआय’ बँकेच्या शेअर्समध्ये 2.74 टक्क्यांची वाढ दिसली. एचडीएफसी, एक्सिस बँक, सन फार्मा, एनटीपीसी, एचडीएफसी बँक, एम अँड एम, कोटक बँक, एलटी, रिलायन्स, इंडसइंड बँक, एसबीआय, आयटीसी, टायटन, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा स्टील, बजाज ऑटो, बजाज फायनान्स, नेस्ले इंडिया, भारती एअरटेल शेअर्समध्ये तेजी दिसून आली.

Advertisement

.. तर एचसीएल टेक, डॉ. रेड्डी, मारुती, टेक महिंद्रा, हिंदुस्तान युनिलिव्हर, पॉवर ग्रिड, एशियन पेंट्स, टीसीएस आणि इन्फोसिसच्या शेअर्समध्ये घसरण झाली.

Advertisement

NSE च्या गेनर्समध्ये आयसीआयसीआय बँक, ग्रॅसिम, एचडीएफसी, अ‍ॅक्सिस बँक, एसबीआयएलईएफच्या शेअर्सचा समावेश आहे. त्याचवेळी आज अदानी पोर्ट्स, डॉ. रेड्डी, एचसीएल टेक, टाटा कंझ्युमर आणि टेक महिंद्रा यांच्या शेअर्समध्ये घट झाली.

Advertisement

BSE वर ट्रेडिंग बंद होताना, एकूण 3,355 कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी झाली. पैकी 1,856 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ, तर 1,356 कंपन्यांची घसरण झाली. आजची एकूण मार्केटकॅप 2 कोटी 32 लाख रुपये आहे.

Advertisement

वर्षात लाखाचे आठ लाख..! शेअर बाजारातील या शेअरमुळे गुंतवणूकदार झालेत मालामाल..
घरबसल्या कारलोन, कार एक्सचेंजचीही सोय.. पाहा कोणत्या कंपनीने ग्राहकांसाठी आणलीय अनोखी सुविधा..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply