Take a fresh look at your lifestyle.

एफडीवर ‘या’ बॅंकात मिळतेय सर्वाधिक व्याज..! मग वाट कसली पाहता करा की गुंतवणूक..!

नवी दिल्ली : कठीण काळात हाताशी काही पैसे असावेत, यासाठी अनेक जण बॅंकेत, पतसंस्थेत गुंतवणूक म्हणून मुदत ठेव, अर्थात ‘फिक्स्ड डिपॉझिट’ (Fixed Deposit-FD) ठेवतात. एफडी ठेवण्यासाठी योग्य बँक निवडण्याला फार महत्त्व आहे. कारण, मुख्य निकष हा व्याजदर असतो.

Advertisement

सर्वाधिक व्याजदर देणाऱ्या बँकेत एफडी करण्यास गुंतवणूकदार प्राधान्य देतात. काही दिवसांपूर्वी बॅंकांपेक्षा अधिक व्याजदर देणाऱ्या पतसंस्थांकडे गुंतवणुकदारांचा ओढा वाढला होता. मात्र, अनेक पतसंस्था अडचणीत आल्याने त्यांच्यावरचा विश्वास आता काहीसा कमी झाला आहे.

Advertisement

सध्याच्या काळात राष्ट्रीयकृत बॅंकांचा व्याजदर खूपच घसरला आहे. बँक बझारच्या (Bank Bazar) आकडेवारीनुसार, मोठ्या आणि प्रस्थापित बँकांच्या तुलनेत नवीन, लहान खासगी बँका जास्त व्याजदर देत आहेत. त्यातही एयू स्मॉल फायनान्स बँक, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक आणि उज्जीवन स्मॉल फायनान्स बँका मुदत ठेवींवर 7 टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहेत.

Advertisement

डीसीबी सारख्या बँकांचा व्याजदर 6.75 टक्के आहे. आरबीएल बँक 6.25 टक्के, तर बंधन बँक 6 टक्के दरानं व्याज देते. एचडीएफसी बँक, (HDFC Bank), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) आणि अ‍ॅक्सिस बँक (Axis Bank) अशा खासगी, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँकेच्या तुलनेत हे व्याजदर जास्तच आहेत.

Advertisement

स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) 2.70 टक्के, बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) 3.20 टक्के, कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank) 4 टक्के दराने व्याज देते. त्यामुळे खासगी, लहान बँकांचा व्याजदर हा सरकारी, खासगी क्षेत्रातील मोठ्या बँकांपेक्षा 2 ते 3 टक्के अधिक असल्याचेच दिसते.

Advertisement

छोट्या खासगी बँकांमध्ये खाते उघडण्यात एक तोटा आहे, तो म्हणजे या बँकामध्ये किमान शिल्लक मोठ्या बँकांपेक्षा जास्त ठेवावी लागते. त्यामुळे मध्यमवर्गीय पगारदार, व्यावसायिकच लहान बँकामध्ये अधिक रक्कम ठेवत असल्याचे दिसून आले आहे.

Advertisement

सरप्राईज आनंद..! बॅंक कर्मचाऱ्यांना मिळणार अचानक सुटी, पाहा आरबीआयच्या आदेशात काय म्हटलंय..?
नोकियाने ओप्पोला खेचले कोर्टात! पाहा कशावरुन पेटलाय दोन दिग्गज कंपन्यांमध्ये वाद..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply