Take a fresh look at your lifestyle.

आरबीआयने दिली की अच्छे दिनची अनुभूती; पहा बँक कर्मचाऱ्यांची कशी लागलीय बंपर लॉटरी..!

मुंबई : जोखीम व्यवस्थापन मार्गदर्शक तत्वांतर्गत रिजर्व बँकेने देशातील ग्रामीण बँका, सहकारी बँकासंह अन्य बँकांना काही सूचना दिल्या आहेत. या बँकांना अनपेक्षित रजा धोरण तयार करण्यास सांगितले आहे. या सुट्टीच्या काळात संबंधित कर्मचाऱ्यास कॉर्पोरेट ई मेल वगळता अन्य कोणतेही कामकाज देण्यात येणार नाही. आरबीआयने धोरणात बदल करत संवेदनशील पदांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अनिवार्य अनपेक्षित रजा धोरण अपडेट केले आहे. तसेच एप्रिल २०१५ चे परिपत्रक रद्द केले आहे.

Advertisement

आजच्या धावपळीच्या जमान्यात प्रत्येकालाच ताण तणावांना सामोरे जावे लागत आहे. आता तर कोरोनाचे संकट आहे. कामकाजाचा ताण तर आहेच. त्यामुळे रोजच्या कामकाजातून काही दिवस सुट्टी मिळावी असे प्रत्येकालाच वाटते. मात्र, बऱ्याचदा ते शक्य होत नाही. बँकेच्या कर्मचाऱ्यांना देखील सुट्टी मिळणे कठीण असते. आता मात्र या कर्मचाऱ्यांसाठी आरबीआयने एक आनंदाची बातमी दिली आहे. बँकेत काही विशिष्ट पदांवरील कर्मचाऱ्यांसाठी सुट्टीची खास योजना बँकेने तयार केली आहे. ट्रेजरी आणि करन्सी चेस्टसह अन्य संवेदनशील पदांवरील बँक कर्मचाऱ्यांना वर्षाकाठी किमान १० दिवसांची सरप्राईज रजा मिळेल. कोणतीही पूर्वसूचना न देती ही रजा अचानक देण्यात येईल.

Advertisement

आरबीआयने या काही सूचना दिल्या आहेत, त्यांची अंमलबजावणी बँकांना लवकर करावी लागणार आहे. कारण, यासाठी आरबीआयने सहा महिन्यांची मुदत दिली आहे. बँकांना त्यांच्या संचालक मंडळाच्या मंजूर धोरणानुसार संवेदनशील पदांची यादी तयार करण्यास आणि वेळोवेळी या यादीचा आढावा घेण्यास सांगितले आहे. या नव्या सुचनांनुसार सहा महिन्यात कार्यवाही सुरू करण्यास रिजर्व बँकेने सांगितले आहे.

Advertisement

दरम्यान, आरबीआयने घेतलेल्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचा फायदा होणार आहे. कारण सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात कामकाजाचा ताण वाढला आहे. बँकांतील कामकाज वाढल्याचा हा परिणाम आहे. या काळात ऑनलाइन व्यवहारात वाढ झाली आहे. तसेच बँकेचे अन्य कामकाज वाढले आहे. नागरिकांचेही कामकाज आहेच. त्यामुळे बँकेतील कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply