Take a fresh look at your lifestyle.

‘तसे’ झाल्यास भाजपची कमी आणि आघाडीची डोकेदुखी जास्तच वाढणार; म्हणून बैठकीकडे देशाचे लक्ष..!

मुंबई : सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळ विस्तारत संधी न दिल्याने महाराष्ट्र भाजपमधील मुंडे गट कमालीचा आक्रमक झालेला आहे. आज या गटाची महत्त्वपूर्ण बैठक वरळी येथील कार्यालयात होत आहे. त्यानिमित्ताने भाजप नेत्या पंकजा मुंडे या शिवबंधन हाती बांधणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे या बैठकीकडे देशाचे लक्ष लागलेले आहे. मात्र, मुंडे यांच्या पक्षबदलाने भाजपची कमी आणि महाविकास आघाडीची डोकेदुखी जास्त वाढणार आहे.

Advertisement

सध्या महाविकास आघाडीच्या अंतर्गत जोरदार वाद होत आहेत. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आक्रमक होतानाच अनेक गंभीर आरोप केलेले आहेत. दुसरीकडे अनेक घोटाळे उघडकीस येत आहेत. त्यातच कॉंग्रेस आक्रमक असताना शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी एकमेकांना सुसंगत भूमिका घेऊन सरकार टिकवले आहे. मात्र, जर पंकजा मुंडे यांनी पक्षांतर करून शिवसेनेत प्रवेश केला तर मग पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी नेते व मंत्री धनंजय मुंडे यांच्या गटातील संघर्षाला वेगळी हवा मिळेल.

Advertisement

एकाच सरकारमध्ये राहून हे दोन्ही गट आमनेसामने येतील. अशावेळी भाजपची झालेली हानी मग जितकी महत्वाची असेल त्यापेक्षाही महत्वाचे असणार आहे ते हे दोन्ही गट एकमेकांशी कसे वागतात..! कारण, पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांच्यातील संघर्ष आता उभ्या महाराष्ट्र राज्याला परिचित आहे. त्यामुळेच पंकजा मुंडे या आपली बहिण खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना मंत्रीपदावरून डावलले गेल्यावर कोणत्या भूमिकेत असणार याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागलेले आहे. त्याचा फैसला आज दुपारी किंवा पुढील दोनच दिवसात होईल अशी शक्यता आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply