Take a fresh look at your lifestyle.

‘महाराष्ट्राची मास्टरशेफ’ स्पर्धा.. पर्यटन विभागाचा अनोखा उपक्रम, सहभागी होण्यासाठी काय कराल..?

मुंबई : महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती जगभर लोकप्रिय आहे. राज्याच्या विविध भागात मालवणी, आग्री-कोळी, खान्देशी, कोल्हापुरी, वऱ्हाडी अशा खाद्यसंस्कृती लोकप्रिय आहेत. महाराष्ट्रात आलेले पर्यटक या स्थानिक खाद्यपदार्थांचा आवर्जून आस्वाद घेतात.

Advertisement

महाराष्ट्रातील याच आवडत्या रेसीपी आता जगभरातील पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन संचलनालयाने ‘महाराष्ट्राचे मास्टरशेफ’ ही ऑनलाईनया रेसीपी स्पर्धा आयोजित केल्याची माहिती पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी दिली.

Advertisement

स्पर्धेतील 15 सर्वोत्कृष्ट रेसीपींना प्रत्येकी 10 हजार रुपये, 40 रेसीपींना प्रत्येकी 5 हजार रुपये, तर उत्कृष्ट 100 रेसीपींना प्रत्येकी 2 हजार रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाकडून सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

Advertisement

स्पर्धेत सहभागासाठी www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर सर्व माहिती उपलब्ध आहे. https://bit.ly/MaharashtracheMasterchef या लिंकवर माहिती, तसेच अर्ज उपलब्ध आहेत.

Advertisement

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्या आवडत्या महाराष्ट्रीयन डिशची व्हिडिओ रेसीपी ऑनलाईन सबमिट करावी लागणार आहे. 11 जुलै ते 10 ऑगस्टदरम्यान ही स्पर्धा होणार आहे. हा व्हिडिओ किमान 30 सेकंद, तर कमाल 15 मिनिटांचा असणे आवश्यक आहे.

Advertisement

व्हिडिओची साईज 100 एमबीपर्यंत असावी. व्हिडीओ रेसीपीसह त्यातील घटक आणि पद्धतीची माहिती लिखीत स्वरुपातही सादर करावी. अभिनव शूटिंग शैली, अन्नाचे सादरीकरण, प्रादेशिक महाराष्ट्रीय रेसीपी, महाराष्ट्रीय पदार्थांचा वापर, अन्नपदार्थ स्वच्छ, आरोग्यदायी ठेवण्यासाठी काळजी, आदींच्या आधारे विजेत्यांची निवड केली जाणार आहे.

Advertisement

मजकूर, संभाषण किंवा व्हॉईस-ओव्हर हा मराठी किंवा इंग्रजी भाषेत वापरता येईल. व्हिडिओंना कोणताही वॉटरमार्क नसावा, असे व्हिडिओ अपात्र ठरविले जातील. तज्ज्ञ शेफ्सच्या समितीमार्फत विजेत्यांची निवड केली जाईल. राज्याच्या विविध भागातील पाककला प्रेमींनी सहभागी होऊन महाराष्ट्राचे मास्टरशेफ बनावे, असे आवाहन संचालक डॉ. सावळकर यांनी केले आहे.

Advertisement

राज्यात खरिपाच्या पेरणीला वेग..! रासायनिक खतांबाबत कृषिमंत्री काय म्हणतात पाहा..?
फडणवीसांची चुप्पीच; चव्हाणांच्या टीकेमुळे पेटलाय भाजप, पहा काय प्रत्युत्तर दिलेय पक्षाने

Advertisement
Advertisement

Leave a Reply