Take a fresh look at your lifestyle.

महाविकास आघाडीत आणखी बिघाडी; अनुदान घोटाळ्याचा मुद्दा पटलावर, राज्यमंत्री तनपुरेंनी सांगितला आतला महत्वाचा मुद्दा..!

अहमदनगर / नाशिक : फक्त ११०० रुपयाचे अन्नधान्याचे कीट २००० रुपयांना खरेदी करून तब्बल ७० कोटींचा गैरव्यवहार केल्याचा धक्कादायक आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या आमदारांनी नुकताच केला होता. यावरून महाविकास आघाडी सरकलाच झटका बसला होता. आता त्यावर आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी धक्कादायक स्पष्टीकरण दिलेले आहे.

Advertisement

आमदार हिरामण खोसकर, माणिकराव कोकाटे व नितीन पवार यांनी मागील पंधरवड्यात आरोप केला होता की, आदिवासी विकास महामंडळ एका किराणा अन्नधान्य कीटसाठी ठेकेदारास १,९८३ रुपये देत आहे. मात्र, आताच्या बाजारभावानुसार याची किंमत १,२१५ असून यात पँकिंग व वाहतूक खर्चासह १,२७० रुपये इतक्या रकमेला हे कीट पडते. मग प्रतिकिट ७१२ रुपये अतिरिक्त देण्यात येतात ते कोणाचे?

Advertisement

निविदा प्रक्रिया पारदर्शी व स्पर्धात्मक होण्यासाठी आम्ही वेळोवेळी आदिवासी विकास मंत्र्यांना लेखी पत्र देऊनही फायदा झाला नाही. आदिवासींच्या हितापेक्षा पुरवठादारांच्या फायद्यासाठी ही निविदा अंतिम करण्यात आली. असा आरोप करतानाच निविदा रद्द करून आदिवासींच्या खात्यावर थेट ४ हजार रुपये या प्रमाणे खावटी अनुदान वर्ग करण्याची मागणी आमदारांची होती. आता तनपुरे यांनी या अनुदानाच्या वाटपामधील आतली खबर लिक केल्याने यावर आता विभागाचे मंत्री के. सी. पडवी काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

त्यावर आता तनपुरे यांनी भाष्य केले आहे. वांबोरी (जि. अहमदनगर) येथे त्यांनी सांगितले आहे की, खावटी अनुदानाची रक्कम डिबीटी स्वरूपातच द्यावी असे लिहिले होते. पण कॅबिनेट मंत्र्यांच्या पुढे जाता येत नाही. आदिवासी बांधवांना पैसे खर्च कसे करावे याचे स्वातंत्र्य आहे. वांबोरी-नगर रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, सुरेश बाफना, माजी सरपंच कृष्णा पटारे, नितीन बाफना, किसन जवरे, उपसरपंच मंदा भिटे, रघुनाथ झिने आदी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement

Leave a Reply