Take a fresh look at your lifestyle.

मुंडेंच्या पक्षबदलाची चर्चा जोरात; आजच्या बैठकीत ठरणार दिशा..!

पुणे : महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात डावलण्यासह आता केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात दखल घेतली न गेल्याने मुंडे गट आक्रमक झालेला आहे. आयाराम आणि अदखलपात्र व्यक्तींना संधी देताना प्रभावी खासदार असलेल्या डॉ. प्रीतम मुंडे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून डावलण्यात आल्याची समर्थकांची भावना आहे. त्यामुळे गटाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या पक्षबदलाची चर्चा जोरात आहे.

Advertisement

मंत्रिमंडळाच्या विस्तारात डावलण्यात आल्याने बीड जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून भाजपच्या पंचायत समिती सदस्यांपासून नगरसेवकांपर्यंत पदाधिकाऱ्यांनी राजीनामास्त्र उगारले आहे. यामुळे १५० राजीनामे झालेले असून समर्थक आक्रमक आहेत. नाराजांची आजच दुपारी बारा वाजता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली वरळी (मुंबई) कार्यालयात बैठक आहे. तिथेच पुढील दिशा स्पष्ट होणार आहे.

Advertisement

बीडचे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे ४ जिल्हा परिषद सदस्य, ३५ पंचायत समिती सदस्य, ४० नगरसेवक, १६ बाजार समिती सदस्य, बीड जिल्ह्यातील भाजपचे अकरा मंडळ अध्यक्ष या शिवाय शिरूर पंचायत समिती उपसभापतींसह अनेकांनी राजीनामे दिलेले आहेत. मुंडे व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी मस्के हे चर्चा करणार आहेत.

Advertisement

पंकजा मुंडे आता शिवसेनेत प्रवेशाचा निर्णय घेतात की भाजपमध्ये राहतात अशीच चर्चा सुरू आहे. आतापर्यंत अनेकदा पंकजा मुंडे यांच्या पक्षबदलाच्या बातम्या आलेल्या आहेत. मात्र, त्यांनी वेळोवेळी डावलले जाऊनही आहे त्याच पक्षात राहणे पसंत केले आहे. पक्षांतर्गत कोंडीमुळे सध्या मुंडे गट कमालीचा नाराज आहे. मात्र, समर्थक कितीही नाराज असले तरी त्यांच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या पुढे कोणीही जाणार नाही. त्यामुळे याप्रकरणी त्यांचाच निर्णय अंतिम असणार आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply