Take a fresh look at your lifestyle.

बदलला की मार्केट ट्रेंड; पहा काय चालूये सोन्याच्या बाजारात, आज झाली ‘इतकी’ वाढ..!

मुंबई : काही दिवसांपासून सोन्याचे दर पुन्हा वाढत आहेत. गुडरिटर्न्स या वेबसाईटनुसार आज मंगळवारी राजधानी दिल्ली शहरात 22 कॅरेट सोन्याचा भाव 46 हजार 790 रुपये तर 24 कॅरेटसाठी 50 हजार 840 रुपये असा होता. कोलकाता मध्ये 22 कॅरेटसाठी 47 हजार 370 रुपये तर 24 कॅरेटसाठी 50 हजार 070 प्रति दहा ग्रॅम असा आहे. मुंबई शहरात 22 कॅरेट सोन्याचा भाव 46 हजार 700 रुपये तर 24 कॅरेटसाठी 47 हजार 700 रुपये असा भाव आहे. चेन्नई शहरात 22 कॅरेटसाठी 45 हजार 210 रुपये तर 24 कॅरेटसाठी 49 हजार 320 रुपये असे नवीन दर आहेत.

Advertisement

सोने आणि चांदीच्या दरात काही दिवसांपासून घसरण होत आहे. आज मात्र हा ट्रेंड बदलला आहे. आज मंगळवारी सोने आणि चांदीच्या दरात थोडी वाढ झाली आहे. आज सकाळच्या सत्रात मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याच्या दरात 68 रुपये तर चांदीच्या दरात 200 रुपये वाढ झाली आहे. नजीकच्या काळात एमसीएक्सवर सोन्याचा भाव 47500 ते 48200 च्या दरम्यान राहिल, असा अंदाज एचडीएफसी सिक्युरिटीजचे कमॉडिटी विश्लेषक तपन पटेल यांनी व्यक्त केला आहे.

Advertisement

देशात सध्याच्या परिस्थितीत सोने आणि चांदीचे दर सारखे बदलत आहेत. कधी कमी तर कधी जास्त असा ट्रेंड सुरू आहे. यामुळे सोन्याचे दर बरेच कमी झाले आहेत. एक वेळी असे वाटत होते की सोने 50 हजारांच्या पुढे जाईल. मात्र आता सध्याची परिस्थिती पाहता असे होण्याची शक्यता कमीच दिसत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी सोने 56 हजारांच्याही पुढे गेले होते. त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली होती.

Advertisement

सोन्याचे दर वाढत होते. त्यामुळे यावेळी सुद्धा सोने 50 हजरांच्या पुढे जाईल असे वाटत होते. त्यानंतर मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर कमी झाला. राज्यांनी लॉकडाऊनचे निर्बंध कमी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे. जागतिक बाजारातील घडामोडींचाही परिणाम सोने आणि चांदीच्या दरांवर होत आहे. देशात काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर सारखे बदलत आहेत. या दोन्ही धातूंचे दर स्थिर राहत नाहीत.

Advertisement

टॉमेटो मार्केटमध्येही तेजी; पहा कोणत्या मार्केटमध्ये मिळतोय सर्वाधिक भाव

Advertisement

नगरमध्ये झालाय मोठा कांदा घोटाळा; ‘त्यांच्या’ नातेवाईकांनी लाटले दणक्यात अनुदान..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply