Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. संकटात भर पडली..! मोदी सरकारचा ‘तो’ही दावा ठरलाय फोल; पहा कशामध्ये पडलोय मागे..!

दिल्ली : करोना लसीकरण हा सध्या आरोग्याचा कमी आणि राजकीय मुद्दा जास्त बनलेला आहे. कारण, एकीकडे लसीकरण मंदावले असतानाच विरोधी पक्षांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून आपलीच शेखी मिरवण्यात केंद्र सरकार आत्ममग्न आहे. त्याचाच फटका बसून आता देशात लसटंचाई आणखी गंभीर वळणावर येत असल्याचे स्पष्ट झालेले आहे.

Advertisement

देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग कमी झाला आहे. केंद्र सरकार लसीकरण वेगात होत असल्याचे कितीही दावे करत असले तरी 21 जूनपासून मात्र लसीकरण कमी होत असल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळे विरोधकांकडून होत असलेल्या आरोपात सुद्धा तथ्य असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. कोविन प्लॅटफॉर्मवरील आकडेवारी नुसार 21 ते 27 जून दरम्यान सरासरी 61.14 लाख लोकांचे लसीकरण झाले. त्यानंतरच्या आठवड्यात म्हणजेच 28 जून ते 4 जुलै दरम्यान हा आकडा कमी होऊन दररोज 41.92 लाख असा होता. 5 ते 11 जुलै दरम्यान दररोज सरासरी 34.32 लाख लोकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले आहे.

Advertisement

राज्यात अनेक ठिकाणी लसीकरणाचा वेग कमी झाला आहे. कोविन पोर्टलवरील माहितीनुसार हरियाणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि छत्तीसगड या राज्यात 21 ते 27 जून दरम्यान दररोज होणाऱ्या लसीकरणात घसरण झाल्याचे दिसून आले. केरळ, अंदमान निकोबार द्वीपसमूह, दादरा नगर हवेली आणि जम्मू काश्मीर या राज्यात लसीकरणात सातत्य दिसून आले. आसाम आणि त्रिपुरा सारख्या राज्यात जेथे कोरोनाचे नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढत होते त्या राज्यात सुद्धा लसीकरणाचा वेग कमी होत असल्याचे दिसून आले.

Advertisement

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पुन्हा स्पष्ट केले आहे आहे, की आजमितीस राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि खासगी दवाखान्यांकडे 1.54 कोटींपेक्षा जास्त कोरोना प्रतिबंधक लसी आहेत. दरम्यान, जगात अजूनही कोरोनाचा धोका कमी झालेला नाही. आता तर हा विषाणू नव्या रुपात येऊन अधिकच घातक झाला आहे. डेल्टा, डेल्टा प्लस, कप्पा यांसारख्या नव्या व्हेरिएंटने अनेक देशात थैमान घातले आहे. युरोप, अमेरिका, चीन, इंडोनेशिया, इस्रायल यांसह अन्य देशात पुन्हा रुग्ण वाढत आहेत. तर दुसरीकडे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग कमी झाल्याने सुद्धा कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे समोर आले आहे. डेल्टा व्हेरिएंट आणि लसीकरण मोहिमेचा वेग कमी झाल्याने जगातील बहुतांश ठिकाणी कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.

Advertisement

corona news : राज्यात ‘हा’ भाग ठरतोय करोना हॉटस्पॉट..!

Advertisement

‘टेट’च्या मदतीने शिक्षक भरती झालीय ‘पवित्र’; पहा हजारोंना कशी मिळाली नियुक्ती थेट..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply