Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ भागावर होणार मान्सूनची कृपादृष्टी; पहा IMD ने नेमका काय अंदाज व्यक्त केलाय

पुणे : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर ठाणे, मुंबई आणि पालघर जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. तसेच उर्वरीत जिल्ह्यात हलका पाऊस होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर १५ जुलै रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आणि पुणे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर ठाणे, मुंबई, पालघर या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे.

Advertisement

सुरुवातीला जोरदार बरसल्यानंतर अचानक गायब झालेला मान्सून आता पुन्हा सक्रीय झाला आहे. राज्यात मागील दोन दिवसांपासून ठिकठिकाणी पाऊस होत आहे. त्यानंतर हवामान विभागाने आता पुन्हा पावसाबाबत अंदाज व्यक्त केला आहे. येत्या १७ जुलैपर्यंत राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच राज्यातील काही जिल्ह्यात अतिवृष्टी होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

Advertisement

१६ जुलै रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे, तर सातारा, पुणे, ठाणे, पालघर आणि मुंबई जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. चंद्रपूर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदूरबार हे जिल्हे वगळता अन्य जिल्ह्यात पाऊस होईल, असे विभागाने स्पष्ट केले आहे. १७ जुलै रोजी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना येलो अलर्ट असेल. तसेच सातारा, कोल्हापूर, रायगड या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply