Take a fresh look at your lifestyle.

मोदी सरकारने ‘तसा’ केलाय लसीकरणाचा पोरखेळ; पहा नेमके काय म्हटलेय चव्हाणांनी

पुणे : चार दिवस लसीकरण बंद ठेवायचे. त्यानंतर लसीकरण करून रेकॉर्ड तयार केल्याचा दावा करायचा हा निव्वळ पोरखेळ आहे, अशा शब्दांत काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

Advertisement

त्यांनी म्हटले आहे की, डिसेंबर पर्यंत देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण करायचे असेल तर किमान 200 कोटी लसींची आवश्यकता राहणार आहे. मात्र, सरकारचे काहीच नियोजन दिसत नाही. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या मुद्द्यावर विरोधक आणि केंद्र सरकार यांच्यात वाद अजूनही सुरूच आहे. देशात अनेक ठिकाणी पुन्हा लसीकरण बंद करण्याची वेळ आली आहे. मात्र केंद्र सरकार मान्य करण्यास तयार नाही. आताही काँग्रेसने लसीकरणाच्या मुद्द्यावर पुन्हा केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

Advertisement

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली होती. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत मतभेद होत आहेत. या मुद्द्यावर चव्हाण यांनी भाष्य केले. ते म्हणाले, की नाना पटोले हे पक्षाचे अध्यक्ष आहेत. पक्ष मजबूत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. ते आपल्या पद्धतीने काम करत आहेत. असे असले तरी महाविकास आघाडी सरकार मजबूत आहे. हे सरकार आपला 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करील असा दावा त्यांनी यावेळी केला.

Advertisement

आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले होते. त्यांच्या या वक्तव्यावर महाविकास आघाडीतील अनेकांनी आक्षेप घेतला होता. राष्ट्रवादी काँग्रेसनेही सूचक इशारा दिला होता. महाविकास आघाडीत तीन पक्ष आहेत, आणि तिन्ही पक्षांनी एकत्र राहिले पाहिजे. मात्र, जर कुणी स्वबळाची भाषा करत असेल तर उरलेले दोन पक्ष एकत्र राहतील असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला होता. त्यानंतर आता काँग्रेसचे नेत्यांनी सुद्धा प्रतिक्रिया देत त्यांच्या वक्तव्यास एक प्रकारे पाठिंबाच दिला आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारावर ते म्हणाले, की मंत्रिमंडळात कुणाला घ्यायचे आणि कुणाला नाही याचा अधिकार पंतप्रधान मोदी यांना आहे. बऱ्याच जणांना मंत्रीमंडळात घेतले नाही त्यामुळे नाराज असणे स्वाभाविक आहे, ही नाराजी काही दिवस चालेल.

Advertisement
Advertisement

Leave a Reply