Take a fresh look at your lifestyle.

‘तिथे’ झालीय एकदमच बिकट परिस्थिती; पहा डेल्टा करोनाचा फैलाव कसा वाढतोय आणि…

दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस यांनी असा इशारा दिला होता, की जग कोविड १९ च्या महामारीच्या अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे. डेल्टासारखे व्हेरिएंट आधिक संक्रामक असून बऱ्याच देशांमध्ये पसरत आहे. अद्याप कोणताही देश या संकटातून बाहेर आलेला नाही. कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट आधिक धोकादायक आहे, आणि काळानुसार तो आणखी बदलत आहे. त्यामुळे आपणास सतत देखरेख ठेवणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. आजमितीस जगातील ९८ पेक्षा जास्त देशांमध्ये हा व्हेरिएंट पसरला आहे. लसीकरण वेगाने न केल्यास यामुळे अवघे जग संकटात सापडू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

Advertisement

कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने जगातील अनेक देशात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे या देशांना पुन्हा लॉकडाऊन सारखे कठोर निर्णय घेणे भाग पडले आहे. कोरोनाचा हा घातक व्हेरिएंट शंभर पेक्षा जास्त देशांमध्ये फैलावला आहे. इंडोनेशियास या व्हेरिएंटने सर्वाधिक फटका बसला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात आला होता. आता मात्र डेल्टा व्हेरिएंटने शिरकाव केल्यानंतर परिस्थिती पूर्ण बदलली आहे. येथे आता रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता सध्या दिसत नाही. त्यामुळे अनेक शहरात लॉकडाऊन केले आहे.

Advertisement

भारताचा शेजारी असलेल्या पाकिस्तानमध्येसुद्धा कोरोनाने थैमान घातले आहे. तसेही या देशात आरोग्य व्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. त्यात आता कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने सरकारचे टेन्शन वाढले आहे. देशातील अनेक शहरात लॉकडाऊन केले आहे. येथे मागील चार दिवसात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण एक टक्क्यांवरुन ५ टक्क्यांवर पोहोचले आहे. देशात कोरोनाची चौथी लाट सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. म्यानमारमध्ये सुद्धा कोरोनाचे संक्रमण वाढत चालले आहे. आयएएनएस वृत्तसंस्थेनुसार देशातील जवळपास १८ शहरातील नागरिकांना घराबाहेर पडू नये, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. रशियामध्ये सुद्धा कोरोनाचा प्रकोप पुन्हा वाढत आहे. मॉस्को, सेंट पीटर्सबर्ग यांसह अन्य शहरात रुग्ण वेगाने वाढत आहेत. ब्रिटेन आणि चीनमधील काही प्रांतात पुन्हा रुग्णवाढ होत आहे. त्यामुळे या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन केले आहे.

Advertisement

याआधी आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रेयेसस यांनी सांगितले होते, की आतापर्यंत कोरोनाच्या जितक्या व्हेरिएंटची माहिती मिळाली आहे, त्यामध्ये डेल्टा व्हेरिएंट सर्वाधिक संक्रामक आहे. कोरोना प्रतिबंधक लस न घेतलेल्या लोकांमध्ये हा व्हेरिएंट वेगाने फैलावत चालला आहे. सध्या कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्याने काही देशांनी लॉकडाऊनचे निर्बंधांत सवलती दिल्या आहेत. त्यामुळे सुद्धा जगभरात कोरोना संक्रमण पुन्हा वाढत चालले आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply