Take a fresh look at your lifestyle.

सतर्क रहा रे बाबांनो.. नाहीतर देशभरात येऊ शकते ‘ते’ही गंभीर संकट..!

दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असताना आता तिसऱ्या लाटेने धोका निर्माण केला आहे. तिसरी लाट अद्याप आली नसली तरी संभाव्य धोका लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकारांनी नियोजनास सुरुवात केली आहे. त्यानंतर आता देशातील डॉक्टरांची प्रमुख संस्था इंडियन मेडिकल असोसिएशनने केंद्र सरकारला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement

कोरोनाची तिसरी लाट जवळ येत आहे. याच काळात राज्यांकडून लॉकडाऊनचे निर्बंध कमी करण्यात येत आहेत. नागरिक सुद्धा निष्काळजीपणा करत आहे. ठिकठिकाणी गर्दी होत असल्याने या घातक विषाणूचा धोका पुन्हा वाढला आहे. या प्रकारांवर आयएमएने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रणा आणि राजकीय नेतृत्वाच्या अथक प्रयत्नांनंतर देशात दुसरी लाट आटोक्यात येत आहे. त्यामुळे आता पुन्हा निष्काळजीपणा करू नये, असे संघटनेने म्हटले आहे.

Advertisement

जगात उपलब्ध पुरावे आणि कोणत्याही महामारीचा इतिहास पाहता कोरोनाची तिसरी लाट येणे निश्चित आहे. ही लाट टाळता येणे अशक्य असल्याचेही सांगण्यात येत आहे. तरी देखील देशात अनेक ठिकाणी नागरिक कोरोना प्रोटोकॉलकडे दुर्लभ करत आहेत. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका जास्तच वाढला आहे. केंद्र सरकारने सुद्धा या प्रकारांची गंभीर दखल घेत पुन्हा कठोर निर्बंध जारी करण्याचा इशारा दिला आहे.

Advertisement

दरम्यान, देशात आता दुसऱ्या लाटेचा जोर कमी झाला आहे. मात्र, तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट येऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. देशात तिसरी लाट आली तरी आता या लाटेचा सामना करण्यास पूर्णपणे सक्षम आहोत, असा दावा केंद्र सरकारने केला आहे. देशात ऑक्टोबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. रॉयटर्स या वृत्त संस्थेने नुकताच एक सर्वे केला होता, यामध्ये आरोग्य तज्ज्ञांची मते जाणून घेण्यात आली. तज्ज्ञांनी असे म्हटले होते, की दुसऱ्या लाटेच्या तुलनेत देश तिसऱ्या लाटेचा मुकाबला अधिक सक्षमतेने करेल. जून महिन्यात हा सर्वे केला होता. यामध्ये काही जणांनी तिसरी लाट ऑक्टोबर मध्ये येईल असे म्हटले आहे. तर काही जणांनी ऑगस्ट महिन्यात तिसरी लाट येईल असे सांगितले. नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान देशात तिसरी लाट येईल, असेही काही तज्ज्ञांनी सांगितले.

Advertisement

बाब्बो.. संकटात भर पडली..! मोदी सरकारचा ‘तो’ही दावा ठरलाय फोल; पहा कशामध्ये पडलोय मागे..!

Advertisement

आय्योव.. बसला की झटका; पण तरी हीसुद्धा आहेच की गुड न्यूज

Advertisement
Advertisement

Leave a Reply