Take a fresh look at your lifestyle.

ये.. कारवाल्यांनो.. झटका बसण्यापूर्वीच वाचा ‘ही’ महत्वाची माहिती..!

पुणे : आपल्याकडे दुचाकी असो किंवा चारचाकी काहीही असो, या वाहनांत प्रवाशांची गर्दी नेहमीचीच आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणारी वाहने तर येथे ठिकठिकाणी दिसतात. दुचाकी वाहने सुद्धा यास अपवाद नाहीत. यामुळे अपघात होण्याचा धोका कायमच असतो. तर दुसरीकडे वाहनांचे सुद्धा नुकसान होत आहे. या प्रकारामुळे वाहनांचे नेमके काय नुकसान होते, याची माहिती घेऊ या…

Advertisement

कारमध्ये क्षमतेपेक्षा जास्त माणसे असतील किंवा ओव्हरलोड असेल तर इंजिनला सर्वाधिक नुकसान सहन करावे लागते. कारण, या ओव्हरलोडींगमुळे इंजिनवर दबाव वाढतो. त्यामुळे इंजिन गरम होते आणि मायलेजमध्ये घट येण्यास सुरुवात होते. जर ही समस्या कायमच असेल तर इंजिन खराब होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे कारमध्ये नेहमी क्षमतेप्रमाणेच माणसे असणे गरजेचे आहे.

Advertisement

वाहनात जास्त प्रवासी असतील तर त्याचा परिणाम वाहनाच्या सस्पेन्शनवर होतो. त्यावर अतिरिक्त दबाव वाढतो आणि वाहनाचे सस्पेन्शन हळूहळू कमजोर होत जाते. याकडे दुर्लक्ष केले तर ही समस्या काही काळानंतर आणखी तीव्र होण्याचा धोका असतो. प्रवासा दरम्यान सस्पेन्शन तुटण्याचाही धोका असतो. त्यामुळे कार किंवा अन्य चारचाकी वाहनात त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असणे धोकादायक ठरू शकते.

Advertisement

वाहनांच्या टायर्सवर सुद्धा याचा परिणाम होतो. वाहनात नेहमीच ओव्हरलोड असेल तर टायर्सचे घर्षण होण्याचे प्रमाण जास्त राहते. यामुळे टायर वारंवार पंक्चर होतो. ऐन प्रवासा दरम्यान जर असा प्रकार घडला तर खूप मनस्ताप सहन करावा लागतो. या समस्येमुळे टायर लवकर बदलावे लागतात.

Advertisement

वाहनांच्या बाबतीत या काही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे कारमध्ये शक्यतो ओव्हरलोडींग करू नये. वाहनांच्या देखभाल दुरुस्तीकडे नियमितपणे लक्ष देण्याची गरज आहे. आता तर अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशी वाहने रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे या तंत्रज्ञानाबाबत सुद्धा माहिती असणे गरजेचे आहे. देशात सध्या पेट्रोल-डिझेलचे भाव वाढत आहेत  यास पर्याय म्हणून इलेक्ट्रीक वाहनांचा पर्याय पुढे आला आहे. या वाहनांना मागणी सुद्धा वाढली आहे. त्यामुळे देशातील अनेक दिग्गज वाहन कंपन्यांनी  आता इलेक्ट्रीक वाहन निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply