Take a fresh look at your lifestyle.

राज्यात खरिपाच्या पेरणीला वेग..! रासायनिक खतांबाबत कृषिमंत्री काय म्हणतात पाहा..?

मुंबई : राज्यात आतापर्यंत खरीपाच्या १५१.३३ लाख हेक्टर क्षेत्रापैकी १०५.९६ लाख हेक्टरवर जवळपास ७० टक्के पेरणी झाल्याची माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली. राज्यात नैऋत्य माॅन्सूनचा पाऊस दाखल झाला असला, तरी अद्याप काही भागात पुरेसा पाऊस झालेला नाही. शेतकरी अजूनही पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. पीकपेरणी व पीकवाढीसाठी पावसाची गरज असून, शेतकऱ्यांना खताची कोणतीही कमतरता जाणवणार नसल्याची ग्वाही कृषिमंत्री भुसे यांनी दिली.

Advertisement

राज्यात आतापर्यंत बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची नोंद झाली आहे. कोकण विभागात मुसळधार पाऊस सुरु आहे. मात्र, औरंगाबाद, लातूर, अमरावती व नागपूर विभागात अजूनही पावसाला जोर आलेला नाही. पुणे व कोल्हापूर विभागात बहुतांश ठिकाणी, तर नाशिक विभागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. राज्यात कालपर्यंत (सोमवारी) ३६८ मिलीमीटर पाऊस झाल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

राज्यात ऊसासह खरिपाचे १५१.३३ लाख हेक्टर क्षेत्र आहे. गेल्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाल्याने खोळंबलेली पेरणीची कामे सुरु झाली आहेत. ज्वारी, बाजरी, मका, भुईमूग, सुर्यफूल, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, तीळ व कारळे ही पिके उगवण ते वाढीच्या अवस्थेत आहेत.

Advertisement

राज्यातील काही भागात अजूनही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा असून, खरिपाशी निगडीत कामांबाबत कृषी विभाग लक्ष ठेवून आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना मार्गदर्शक सूचनादेखील देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

कोकण विभागात खरिपाचे ४.४२ लाख हेक्टर क्षेत्र असून, पैकी ०.९८ लाख हेक्टर (२२.१७ टक्के) वर पेरणी झाली आहे. नाशिक विभागात २१.१९ लाख हेक्टर क्षेत्र असून, पैकी ११.२६ लाख हेक्टर (५३.१२) टक्के) वर पेरणी झाली आहे.

Advertisement

पुणे विभागात ८.६७ लाख हेक्टर खरीपाचे क्षेत्र असून, आतापर्यंत ६. ४१लाख हेक्टर (७३. ९९ टक्के) पेरणी झाली आहे. कोल्हापूर विभागात खरीपाचे क्षेत्र ८.०३ लाख हेक्टर असून ६.७३ लाख हेक्टर (८३.७७टक्के) पेरणी झाली आहे. औरंगाबाद विभागात २०.२३ लाख हेक्टर खरीपाचे क्षेत्र असून त्यापैकी १७.५२ लाख हेक्टर (८६.६० टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

Advertisement

लातूर विभागात खरीपाचे क्षेत्र २७.९४ लाख हेक्टर असून त्यापैकी २४.९८ लाख हेक्टर (८६.९०टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. अमरावती विभागात ३२.२४ लाख हेक्टर क्षेत्रापैकी २६.२९ लाख हेक्टर (८१.५५ टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

Advertisement

नागपूर विभागात १९.२६ लाख हेक्टर क्षेत्रापैकी ११ २९ लाख हेक्टर (५८. ६५ टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे, असे कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले.

Advertisement

बाब्बो.. शेती व शेतकऱ्यांवरील ‘हे’ संकट भयंकरच की; पहा काय झालाय नेमका परिणाम
‘तिथे’ झालीय एकदमच बिकट परिस्थिती; पहा डेल्टा करोनाचा फैलाव कसा वाढतोय 

Advertisement
Advertisement

Leave a Reply