Take a fresh look at your lifestyle.

स्वस्तात सोनेखरेदीची संधी..! आरबीआयने दिलीय संधी, मग वाट कसली पाहता, करा की खरेदी..!

नवी दिल्ली : रुपयाच्या तुलनेत डॉलरची घसरण झाल्याने सोने-चांदीच्या दरात आज (ता.12) मोठी घसरण झाली. सोने 169 रुपयांनी घसरुन प्रति तोळा 46,796 रुपयांवर बंद झाले. तसेच चांदीत 300 रुपयांची घसरण होऊन 67,611 रुपये प्रति किलोवर बाजार बंद झाला.

Advertisement

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या दरावर दबाव दिसून आला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या किमतीत 0.60 टक्के घसरण झाली. सोने 1800 डॉलर्सच्या खाली गेले. चांदीवर दबाव पाहायला मिळाला. सध्या ती 0.86 टक्क्यांच्या खाली औंस 26.00 डॉलरच्या स्तरावर व्यापार करीत होती.

Advertisement

डॉलरच्या तुलनेत आज रुपया 6 पैशांच्या वाढीसह 74.58 वर बंद झाला. सकाळी रुपया 74.49 च्या पातळीवर उघडला होता. व्यापारादरम्यान तो सर्वात उच्च पातळी 74.40 आणि सर्वात कमी 74.59 च्या पातळीवर पोहोचला होता.

Advertisement

दरम्यान, आरबीआयने आजपासून Sovereign Gold Bond Scheme चे सबस्क्रिप्शन सुरु केले. त्यामुळे गुंतवणुकदारांना पुढचे काही दिवस स्वस्तात सोनेखरेदीची संधी आली आहे. सध्याच्या काळात बाँडस सोन्यातील गुंतवणुकीचा अत्यंत सुरक्षित पर्याय मानला जातो.

Advertisement

अगदी एक ग्रॅमपासूनही बाँडसमध्ये गुंतवणूक करता येते. प्रत्यक्षात घरातील तिजोरी, बँकेच्या लॉकरमध्ये सोने (Gold) ठेवण्याची जोखीम पत्करण्यापेक्षा सॉवरेन गोल्ड बॉन्ड तुलनेत सुरक्षित पर्याय समजला जातो.

Advertisement

रिझर्व्ह बँकेने सिरीजसाठी प्रति ग्रॅम इश्यू प्राईस 4,807 रुपये निश्चित केली आहे. सॉवरेन गोल्ड बॉन्डमध्ये ऑनलाईन गुंतवणूक केल्यास, तुम्हाला प्रति ग्रॅम सोन्यापाठी 50 रुपयांची सूट मिळणार आहे.

Advertisement

ऑनलाईन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी गोल्‍ड बॉन्‍डचा भाव प्रतिग्रॅम 4757 रुपये आहे. सध्या सोने-चांदीचा दर सामान्यांच्या आवाक्यापलीकडे गेला आहे. त्यामुळे सोने खरेदीचे (Gold) नाव काढले की अनेकांच्या पोटात गोळा येतो. मात्र, आता एका सरकारी योजनेच्या माध्यमातून सोनं स्वस्तात खरेदी करण्याची संधी चालून आली आहे.

Advertisement

म्हणून आठवड्यात ०.९ टक्के वाढ झाली सोन्याच्या दरात; पहा नेमके काय चालूये जगभरात
घरबसल्या कारलोन, कार एक्सचेंजचीही सोय.. पाहा कोणत्या कंपनीने ग्राहकांसाठी आणलीय अनोखी सुविधा..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply